AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | स्पायडरमॅनप्रमाणे फिल्मी स्टाइलमध्ये चार मजली इमारतीवर चढला चोर, पहा हा व्हिडिओ

VIRAL VIDEO | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक चोरटा चौथ्या मजल्यावर चढतो, लोकांनी पाहिल्यानंतर त्याला काय करावं लागलंय हे व्हिडीओत पाहा.

VIDEO | स्पायडरमॅनप्रमाणे फिल्मी स्टाइलमध्ये चार मजली इमारतीवर चढला चोर, पहा हा व्हिडिओ
पहा हा व्हिडिओImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 15, 2023 | 7:53 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) रोज नवे व्हिडीओ (viral video) पाहायला मिळतात. त्यामध्ये काही व्हिडीओ असे असतात की, त्यामुळे लोकांना धक्का बसतो, किंवा आनंद होतो. सध्या एका चोरट्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये चोरट्याने जे काही केलं ते पाहून नेटकऱ्यांना धक्काही बसला आहे आणि घामही फुटला आहे, तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर (trending news) तुमची देखील प्रतिक्रिया आम्हाला सांगा. आता चोरट्याला व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल एवढं मात्र नक्की.

लोकांनी त्या चोरट्याचं कौतुकं केलं आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर पटकन व्हायरल झाला आहे. व्हिडीओत दिसत असलेला चोरटा चोरी करण्याच्या उद्देशाने चौथ्या मजल्यावर चढला आहे. ज्यावेळी चोरटा भरदिवसा बिल्डींगच्यावरती चढत आहे, त्यावेळी इतर लोकांनी त्या चोरट्याला पाहिलं आहे. त्या चोरट्याने पाईपचा आधार घेऊन चौथ्या मजला गाठला होता. हा व्हिडीओ पाहिल्यापासून त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काही प्रतिक्रिया वाईट आहेत, काही लोकांनी त्या चोरट्याचं कौतुकं केलं आहे.

चौथ्या माळ्यावर चोर चढला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मरती शेअर झाला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवरती @gharkekalesh या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत दिसत असलेला चोर चौथ्या मजल्यावर चढत आहे. ज्यांनी हा व्हिडीओ तयार केला आहे. ते त्या चोराला आवाज देत आहेत. त्यानंतर चोरटा पटकन खाली उतरताना दिसत आहे. हे सगळं पाहून नेटकरी एकदम घाबरले आहेत.

चोरट्याचा व्हिडीओ लोकांनी पुन्हा-पुन्हा पाहिला आहे.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ सगळ्याचं लक्ष खेचत आहे. हा व्हिडीओ 93 हजार लोकांनी पाहिला आहे. त्यावर विविध प्रकारच्या कमेंट सुध्दा आल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘तिथून एक मोठा दगड फेकून मारा.’ आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘आता सामान्य माणसाने काय करावे? येथे दिवसाढवळ्या लुटमारीच्या घटना घडतील. तिसर्‍या नेटकऱ्याने लिहिले की, ‘आवाज करून चोराची सगळी मेहनत वाया गेली.’

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान