भांडखोर आहे… शिवीगाळ करतो… असं कॅरेक्टर सर्टिफिकेट कधी पाहिलंय का? का लिहिलंय असं?

Character Certificate Viral: सोशल मीडियावर व्हायरल होतोय कॅरेक्टर सर्टिफिकेट, असं कॅरेक्टर सर्टिफिकेट कधी पाहिलंय का? सध्या सर्वत्र कॅरेक्टर सर्टिफिकेटची चर्चा...

भांडखोर आहे... शिवीगाळ करतो... असं कॅरेक्टर सर्टिफिकेट कधी पाहिलंय का? का लिहिलंय असं?
फाईल फोटो
| Updated on: Jul 07, 2025 | 2:50 PM

Character Certificate Viral: भारतात कोणतंही सरकारी नोकरी, प्रशासकीय काम किंवा कोणतीही सरकारी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अनेकदा चारित्र्य प्रमाणपत्र (Character Certificate) आवश्यक असते. काम पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र सामान्यतः वॉर्ड नगरसेवक किंवा गावाच्या सरपंचांकडून जारी केलं जातं. ते त्या व्यक्तीच्या चांगल्या वर्तनाची आणि सामाजिक प्रतिमेची पुष्टी करते. परंतु एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे ही सामान्य प्रक्रिया व्हायरल कॉमेडी बनली आहे.

सध्या सोशल मीडियावर एक चारित्र्य प्रमाणपत्र तुफान व्हायरल होत आहे. ते चारित्र्य प्रमाणपत्र पाहिल्यानंतर अनेकांना हसू देखील आलं असेल. चारित्र्य प्रमाणपत्राचा फोटो @santa_banta_jokes या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. पण चारित्र्य प्रमाणपत्र अधिकृत आहे का… याबद्दल काहीही कळू शकलेलं नाही.

 

 

सांगायचं झालं तर, 20 जुलै 2019 रोजी गावाच्या सरपंचाने दौसा जिल्हा (राजस्थान) येथील जयसिंगपुरा गावातील रहिवासी ज्ञान चंद्र बैरवा यांच्या नावानं जारी केलं. या प्रमाणपत्रात, ‘चांगली वर्तणूक करणारा माणूस’ सारख्या वाक्यांऐवजी, काही कटू सत्ये लिहिली गेली होती. पोस्ट शेअर करण्यात आलेली नाही. परंतु असे म्हटले जात आहे की, यामध्ये त्या व्यक्तीच्या वर्तनाबद्दल थेट आणि कठोर टिप्पण्या करण्यात आल्या, ज्यावरून असं दिसून येत होतं की सरपंच रागावले होते किंवा ते विनोदी मूडमध्ये होते.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या विनोदी पोस्टला आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त लोकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘जेव्हा तुमचा लहानपणीचा शत्रू सरपंच होतो…’ दुसरा एक नेटकरी म्हणाला, ‘शेवटी एक प्रामाणिक चारित्र्य प्रमाणपत्र!’ सध्या पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.