ट्रेनच्या बाथरूममध्ये प्रवासी तब्बल 6 तास बंद, अधिकाऱ्यांनी तोडला दरवजा आणि पुरुषाची अवस्था पाहून धक्काच बसला

Passenger Locked In Train Bathroom: ट्रेनच्या बाथरुमध्ये तब्बल 6 तास बंद असलेल्या पुरुषाची अशी झाली अवस्था, अधिकाऱ्यांनी बाथरुमचा दरवाजा तोडल्यानंतर प्रवासी बाहेर आला पण अशा अवस्थेत...

ट्रेनच्या बाथरूममध्ये प्रवासी तब्बल 6 तास बंद, अधिकाऱ्यांनी तोडला दरवजा आणि पुरुषाची अवस्था पाहून धक्काच बसला
फाईल फोटो
| Updated on: Oct 04, 2025 | 9:42 AM

Passenger Locked In Train Bathroom: ट्रेनमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लांबचा प्रवास असेल कर, अनेक जण ट्रेन हाच पर्याय निवडतात. ट्रेनच्या एका बोगीमध्ये जवळपास 72 – 80 प्रवासी प्रवास करतात. हा आकडा जनरल, स्लीपर, 3AC, 2AC आणि 1AC नुसार कमी – जास्त होतो. पण एक बोगीमध्ये 4 टॉयलेट असतात. अशा परिस्थितीत, ते वापरताना, प्रत्येक प्रवाशाने नागरी भावना लक्षात घेऊन कमीत कमी वेळेत बाथरूम रिकामं करायचं असतं…

पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक प्रवासी एक दोन तास नाही तर, तब्बल 6 तास ट्रेनच्या बाथरुममध्ये बंद होता. त्याच्या या कृतीमुळे इतर प्रवाशांना त्रास झाला आणि त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी स्क्रूड्रायव्हरने गेट उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो प्रवासी बाहेर आला, परंतु त्याच्या या अवस्थेने सर्वांनाच धक्का बसला.

 

 

इतर प्रावशांनी तक्रार केल्यानंतर रेल्वे अधिकांऱ्यानी बाथरुमचा दरवाजा तोडला. व्हिडिओमध्ये असं दिसून येते आहे की, दरवाजा तोडला जात असतानाही प्रवासी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत नाही. यादरम्यान, लोक आपापसात बोलत राहतात आणि विचारतात, “प्रवासी कोण आहे?’,
अखरे अधिकाऱ्यांनी पुरुषाला बाथरुमबाहेर काढलं… पुरुषाला बाथरुमबाहेर काढल्यानंतर अधिकारी त्याला प्लॅटफॉर्मवर आणतात आणि त्याची विचारपूस करण्यास सुरु करतात… 6 तासांनंतर बाथरुमबाहेर आलेल्या पुरुषाची अवस्थापाहून सर्वांना धक्का बसतो…

सांगायचं झालं तर, Instagram वर रील @i_am_saleem_ नावाच्या नेटकऱ्याने पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत नेटकरी म्हणाला, ‘6 तास बाथरुमचा दरवाजा बंद आहे…’ रील आतापर्यंत 1 लाख 31 हजार लोकांनी पाहिला आहे. शिवाय अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘पुरुष 6 तास बाथरुममध्ये काय करत होता…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आधी व्हिडीओ काढतील… बाकी काही नाही…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘ट्रेनमधील बाथरुमसाठी कोणती चावी नाही का?’, व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली आहे.  सोशल मीडियावर रोज नवीन व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात.