Viral Video: ‘दुल्हन का झरना’ पाहिलात का? हा अद्भुत देखावा पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

सध्या एक अनोखा धबधबा चर्चेचा विषय बनला आहे. या अनोख्या धबधब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Viral Video: दुल्हन का झरना पाहिलात का? हा अद्भुत देखावा पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Waterfall
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Aug 17, 2022 | 10:29 AM

या पृथ्वीवर एकापेक्षा एक सुंदर आणि अद्भुत ठिकाणं आहेत, जी लोकांना आश्चर्यचकित करतात. कुठे उंच डोंगर तर कुठे लांब नद्या तर कुठे सुंदर धबधबे (Waterfall) दिसतात. त्याचबरोबर काही ठिकाणी समुद्राच्या लाटाही इतक्या सुंदर दिसतात की त्या पाहून माणूस मंत्रमुग्ध होतो. अशी सुंदर ठिकाणं जगभरात अस्तित्वात आहेत, जिथे लोक कधी ना कधी जाण्याचं स्वप्न पाहतात. तुम्ही जगात एकापेक्षा एक धबधबे पाहिले असतील, ज्यात भारताचा दूधसागर (DoodhSagar) आणि अमेरिकेचा नायगरा (Niagara Falls) यांचाही समावेश आहे. ते इतके सुंदर दिसतात की त्यांची जगभरात चर्चा होते. पण सध्या एक अनोखा धबधबा चर्चेचा विषय बनला आहे. या अनोख्या धबधब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे डोंगराच्या माथ्यावरून पडताना त्याचा आकार एखाद्या नटलेल्या वधूप्रमाणे पहायला मिळतो. परदेशात वधू ही पांढरा गाऊन परिधान घालते, त्यामुळे हा धबधबा जणू त्या वधूसारखाच दिसतो. वरून धबधबा कोसळू लागल्यावर तो भाग डोक्यासारखा दिसतो आणि जसजसा तो खाली वाहू लागतो, तसा पाण्याचा आकार एखाद्या वधूप्रमाणे घेऊ लागतो. म्हणूनच या धबधब्याला ‘दुल्हन का झरना’ म्हणजेच ‘वधूचा धबधबा’ असंही म्हटलं गेलंय. असा दावा केला जात आहे की हा धबधबा पेरूमध्ये आहे, ज्याला निसर्गाचं एक अद्भुत आश्चर्य म्हणता येईल. असा आकार घेणारा धबधबा तुम्ही क्वचितच पाहिला असेल. हे अद्वितीय आणि आश्चर्यकारक आहे.

पहा व्हिडीओ-

या अप्रतिम धबधब्याचा व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @wowinteresting8 या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. 52 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 28 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर एक लाख 14 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केलं आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी या धबधब्याला सुंदर म्हणत आहेत तर कोणी तो खोटा असल्याचं सांगत आहेत.