
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चंद्रपूरमधील असल्याचे बोललो जात आहे. या व्हिडिओमध्ये वाघाने एका माणसावर हल्ला केल्याचे दिसत आहे, हल्ल्यानंतर वाघ त्या व्यक्तीला फरपटत ओढत नेताना दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील फॉरेस्ट गेस्ट हाऊसमध्ये 31 ऑक्टोबरला ही घडली असल्याचा दावा केला जात आहे. मात्र नेटकऱ्यांना यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
व्हायरल व्हिडिओ हा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील फॉरेस्ट गेस्ट हाऊसमधील असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर 58 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही नेटिझन्स घाबरले होते, तर काहींनी हा व्हिडिओ एआय-जनरेटेड असल्याचे म्हटले आहे.
एका नेटकऱ्याने म्हटले की, ‘हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून एआय-जनरेटेड आहे. असे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत.’ दुसऱ्या एकाने म्हटले की, ‘एआयने हा व्हिडिओ तयार केला आहे, परंतु त्यात काही चुका आहेत.’ आणखी एका नेटकऱ्याने म्हटले की, ‘वन्य प्राण्यांना कधीही हलक्यात घेऊ नला, ते कधीही रागाऊ शकतात आणि हल्ला करू शकतात.
सीसीटीवी रिकॉर्डिंग at ब्राह्मपुरी फारेस्ट गेस्ट हाउस. (चंद्रपुर डिस्ट्रिक)👇👇👇 pic.twitter.com/d4SGS2Fu6N
— Himmu (@Himmu86407253) November 7, 2025
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ब्रह्मपुरीचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) सचिन नारद यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले की, ‘हा व्हायरल व्हिडिओचा चंद्रपूर जिल्ह्याशी संबंधित नाही. हा व्हिडिओ ब्रह्मपुरीचा नाही. तो कुठे रेकॉर्ड केला गेला हे माहित नाही.’
वन अधिकाऱ्यांना असाही संशय आहे की, हा व्हिडिओ डिजिटल पद्धतीने बनवली गेली असावी. याबाबत बोलताना सचिन नारद म्हणाले की, ‘हा व्हिडिओ एआयने तयार केला असावा असा संशय आहे.’ पुढे बोलताना नारद यांनी लोकांना चुकीची माहिती पसरवणे थांबवण्याचे आवाहन केले आहे. यामुळे वाघांचा धोका असलेल्या भागात भीती परसण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे, त्यामुळे या भागात नेहमी वाघ पहायला मिळतात, तसेच वन्यजीव अनेकदा स्थानिकांवरही हल्ला करतात. याच कारणामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला असल्याची शक्यता आहे.