Video | मास्टर शेफची जादुगरी, तापलेल्या वाळवंटात बनवला चटपटीत पदार्थ, व्हिडीओ व्हायरल

एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ प्रसिद्ध शेफ बुराक ओज़्देमीर (chef Burak Ozdemir) यांचा असून त्यांनी तापलेल्या वाळवंटामध्य फ्रायम्स तळले आहेत. त्यांच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे.

Video | मास्टर शेफची जादुगरी, तापलेल्या वाळवंटात बनवला चटपटीत पदार्थ, व्हिडीओ व्हायरल
Turkish Chef Burak Ozdemir Cooked Fryums in Desert
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 1:37 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कधी कोणता व्हिडीओ चर्चेत येईल हे सांगता येत नाही. लोकांना चटपटीत खाद्यपदार्थांचे व्हिडीओ पाहायला आवडतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ प्रसिद्ध शेफ बुराक ओझ्देमीर (chef Burak Ozdemir) यांचा असून त्यांनी तापलेल्या वाळवंटामध्य फ्रायम्स तळले आहेत. त्यांच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये फ्रायम्स तळण्यात आले आहेत. प्रसिद्ध शेफ बुराक ओझ्देमीर यांनी ही कामगिरी करुन दाखवली आहे. त्यासाठी त्यांनी मोठी कढई घेतलीय. ही कढई त्यांनी वाळवंटात ठेवली आहे. तसेच तेल टाकून खाली आगदेखील लावली आहे. वाळवंटात तापमान चांगलेच वाढलेले आहे. असे असूदेखील त्यांनी कढईमध्ये तेल टाकून फ्रायम्स तळले आहेत. काही सेकंदाच्या या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटले आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

शेफ बुराक यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओला पाहून भारावून गेले आहेत. अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. हा व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर केला जातोय. आतापर्यंत हा व्हिडीओ 10 कोटी वेळा पाहिला गेलाय. मिळालेल्या माह माहितीनुसार शेफ बुराक यांनी हा व्हिडीओ 17 ऑक्टोबर रोजी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला होता. सध्या हाच व्हिडीओ चर्चेत आलाय. इन्स्टाग्रामवर शेख बुराक यांचे 29.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.

पाहा व्हिडीओ :

बुराक यांच्या प्रत्येक व्हिडीओवर लाखोंनी लाईक्स

बुराक इन्स्टाग्रावर प्रसिद्ध आहेत. जेवण तयार करण्याची त्यांची अनोखी पद्धत नेटकऱ्यांना चांगलीच आवडते. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओला लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळतात.

इतर बातम्या :

Video | वाघाने गाईला चपळाईने पकडलं, जंगलात फरफटत नेण्याचा प्रयत्न, शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद

Video | ना वाजंत्री, ना डीजे, तरी आनंदी अनंद गडे, नवरी-नवरदेवाचा मजेदार व्हिडीओ व्हायरल

VIDEO: जेव्हा न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची अडीच वर्षांची मुलगी फेसबुक लाईव्हच्या मध्ये येते! बघा हा मजेदार आणि भावपूर्ण संवाद