नोकरी गेल्याने निराश झाला, विमानाने देशात येत होता, अचानक बनला 13 कोटींचा मालक

मॅथ्यू अशा लोकांसाठी एक उदाहरण बनला आहे, जे त्यांच्या जीवनातील समस्यांपुढे हार मानून आपले जीवन संपवतात. एखाद्याचे आयुष्य कधी बदलले हे कोणालाच माहिती नसते. म्हणून, प्रत्येक व्यक्तीने जीवनात संयम ठेवून आपले काम करीत राहीले पाहीजे. न जाणो तुमचे आयुष्यही देखील काही क्षणात बदलू शकते.

नोकरी गेल्याने निराश झाला, विमानाने देशात येत होता, अचानक बनला 13 कोटींचा मालक
| Updated on: Feb 06, 2025 | 8:36 PM

देव देतो ते छप्पर फाडके देतो…असा अनुभव एका तरुणाला आला आहे. कारण हा बेरोजगार तरुण अबूधाबीहून कंटाळून आपल्या देशात रवाना होण्यासाठी निघाला होता. त्याची नोकरी गेल्याने त्याला आता त्याच्या घरी परतण्याशिवाय काही उपाय राहीला नव्हता. अशात त्याच्या नशिबाची बंद कवाडे अचानक उघडली. आपल्या मायदेशात जाण्यासाठी तो एअरपोर्टवर आला. तेथे त्याच्यासोबत अशी काही घटना घडली की त्याचे जीवनच बदलले…

ज्या तरुणाकडे काही दिवसांपूर्वी चांगली नोकरी नव्हती. त्याचे नशीब अचानक असे फळफळले की रातोरात तो करोडपती झाला. तुम्ही विचार करत असला की त्याच्या जीवनात असा काय चमत्कार घडला की तो रातोरात करोडपती झाला. चला तर पाहूयात या तरुणासोबत नेमके काय घडले…

केरळच्या कुट्टनाद येथे राहणारा तोजो मॅथ्यू बेरोजगार झाल्याने आपला देश सोडून अबूधाबीला नोकरीसाठी गेला होता. अबू धाबीला गेल्यानंतर तो सुपरवायझरची नोकरी करीत होता. परंतू तेथे त्याचे मन लागेना म्हणून त्याने नोकरी सोडली. त्याला भारतात परतायचे होते. म्हणून त्याने मित्राकडे पैसे मागितले. त्याने त्या पैशातून एअरपोर्ट सहज गंमत म्हणून लॉटरीचे तिकीट काढले. त्याला कल्पना नव्हती हे लॉटरीचे तिकीट त्याचे भाग्य बदलून टाकणार आहे. त्याने मित्राच्या पैशाने खरेदी केलेल्या तिकीटाचा क्रमांक 075171 होता. मॅथ्युने खरेदी केलेल्या तिकीटाने त्याची जिंदगी बदलून टाकली.

लॉटरी जिंकल्याने  स्वप्न सत्यात उतरले

मॅथ्युने या लॉटरीच्या तिकीटाने ७ मिलियन दिरहम म्हणजे सुमारे १३ कोटी १० लाखाचे बक्षिस जिंकले आहे. एवढे पैसे जिंकल्याने आता तो त्याची सर्व स्वप्न पूर्ण करु शकणार आहे, शिवाय त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीच बदलणार आहे. मॅथ्युची आई म्हणाली की मॅथ्युला नेहमी वाटायचे की स्वत:चे घर असावे. परंतू पैशाअभावी त्याला घर बांधता येत नव्हते. आज त्याचे स्वप्न लॉटरी लागल्याने प्रत्यक्षात अस्तित्वात येणार आहे. त्याने अबूधाबीला जाण्यापूर्वी आपले लवकरच स्वत:चे घर असेल असे त्याच्या वडीलांना सांगितले होते आणि लॉटरी जिंकल्याने हे स्वप्न सत्यात उतरले आहे.