AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस पत्थर की कीमत तुम क्या जानो…लोक हजारो रुपये हसत हसत मोजायला तयार

पाळीव प्राणी पाळायचे असतील तर त्यांना न्हाऊमाखु घालणे, त्यांना सकाळ संध्याकाळ फिरायला घेऊन जाणे,त्यांचे सर्व लाड हटट् पुरविणे यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ हवा.आपल्या लाडक्या पेटची शी आणि सू देखील साफ करण्याची आपली तयारी हवी...त्यावर पर्याय आलाय...

इस पत्थर की कीमत तुम क्या जानो...लोक हजारो रुपये हसत हसत मोजायला तयार
| Updated on: Feb 06, 2025 | 6:05 PM
Share

अनेकदा एखादा जगावेगळा छंद माणसाला चर्चेत आणतो. नंतर त्याचा ट्रेंड देखील होतो. अनेकांना वस्तू जमविण्याचे छंद असतात.काहींच्या घरात आता पेट पाळण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की घरटी एक प्राणी अस्तित्वात आहे. त्यात मानवाचा तहहयात मित्र कुत्रा हा तर प्रत्येकाच्या कुटुंबाचा सदस्य बनला आहे. हे पेट पुराण इतके वाढले आहे की आता तर पेटसाठी रेनकोट आणि कपडे देखील आलेले आहेत. सध्या पाळीव प्राणी पाळण्याचा छंद परमोच्च शिखरावर असताना आणखी एक छंद जिवाला लावी पिसे अशी घटना घडली आहे. पाळीव पेट नव्हे तर पाळीव दगड पाळत आहेत. पेट दगड ऐकायला विचित्र वाटत असेल पण हा छंद आताचा नाही पन्नास वर्षे जुना आहे, बरका…

गॅरी डाहल नावाच्या व्यक्तीला पाळीव प्राण्यांबद्दलच्या लोकांच्या तक्रारी कानावर आल्या, तेव्हा त्याच्या ‘पेट रॉक’ चा विचार डोक्यात चमकला. तेव्हा त्यांनी मित्रांना सूचवले की तुम्हाला असा पाळीव प्राणी घरात ठेवायला हवा जो दगडासारखा असेल..आणि केवळ शोभेचा असेल. तुम्ही पेट ऐवजी पेट रॉक काही पाळत अशी आयडिया त्याने अक्षरश: विकली. याचा फायदा हा असेल की याला अंघोळ घालायची गरज नाही, भरवायची किंवा फिरायला घेऊन जायची देखील गरज नाही आणि कमी पैशात आपले मन रिझवण्यासाठी हा पुरेसा आहे.

त्यानंतर सुरु झाली क्रेज ..

गॅरी डहाल याने १९७० मध्ये ‘पेट रॉक’  विकायला सुरुवात केली. पेट रॉकची क्रेज इतकी वाढली की ती अक्षरश: वेडात बदलली. त्यामुळे गॅरी प्रचंड श्रीमंत झाला. त्याने चिक्कार पैसा कमावला. पेट रॉक हा एक गुळगुळीत दगड आहे. जेव्हा पहिल्यादा हा विक्रीसाठी मार्केटमध्ये आला तेव्हा या दगडा अक्षरश: उबदार बिछान्यात ठेवले होते. म्हणजे एखादा पाळीव प्राणीच टोपलीत बसलाय असे वाटायचे. त्याला श्वास घेण्यासाठी छीद्र देखील होती. हा पेट रॉक मालकाकडे कसलीही तक्रार करणार नाही. येणाऱ्या अनेक वर्षात हा समर्पित दोस्त आणि साथी बनून तुमच्या सोबत राहील अशी त्याची जाहीरात केली होती. डिसेंबर १९७५ च्या ख्रिसमसमध्ये पेट रॉकची विक्री तुफान झाली. त्यानंतर हळूहळू त्याची लोकप्रियता संपली. परंतू आता पुन्हा एकदा २०२२ मध्ये एका खेळणे बनविण्याच्या कंपनीने या दगडाचे हक्क विकत घेतले. सुपर इंपल्स कंपनीने ही आयडिया पुन्हा पुनर्जीवित केली आहे.  लोक या दगडासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहेत.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.