AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पिस खाऊ नका, ग्रेव्ही खा ना….,’ फ्लाईटमध्ये शाकाहारीला दिले मांसाहारी जेवण, श्वास कोंडून मृत्यू

कतार एअरवेजने प्रवास करताना एका शाकाहारी प्रवाशाला शाकाहारी ऐवजी चक्क नॉनव्हेज आहार देण्यात आला... या मांसाहारी आहाराने श्वास कोंडून एका शाकाहारी प्रवाशाचा मृत्यू झाला..अन्...

'पिस खाऊ नका, ग्रेव्ही खा ना....,' फ्लाईटमध्ये शाकाहारीला दिले मांसाहारी जेवण, श्वास कोंडून मृत्यू
qatar airways
| Updated on: Oct 09, 2025 | 6:37 PM
Share

कतार एअरवेजने प्रवास करणाऱ्या शाकाहारी प्रवासी डॉ.अशोका जयवीरा यांनी शाकाहारी जेवण मागवले होते. त्यांना त्यानंतर चुकून मांसाहारी जेवण देण्यात आले होते. फ्लाईट अटेंडेन्टने त्यानंतर ग्रेव्ही खाण्याचा सल्ला देला होता. मांस खाल्ल्याने त्यांना गुदमरल्यासारखे वाटले त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मुलाने या प्रकरणात कतार एअरव्हेजवर खटला गुदरला आहे आणि नुकसान भरपाई देखील मागितली आहे.

८५ वर्षीय शाकाहारी प्रवासी डॉ. अशोका जयवीरा हे कतार एअरवेजने लॉस एंजिल्स ते कोलंबो असा प्रवास करत असतानात त्यांनी शाकाहारी जेवण मागवले होते, त्यांना त्यावेळी मांसाहारी जेवण पुरवण्यात आले.त्यांनी या संदर्भात तक्रार करताच त्यांना ग्रेव्ही वेगळी करुन खाण्याचा सल्ला दिला गेला. त्यामुळे त्यांचा श्वास कोंडल्याने मृत्यू झाला होता. ३० जून २०२३ रोजी ही घटना घडली होती. लॉस एजिल्स ते कोलंबो अशा १५.५ तासांच्या प्रवासात ही घटना घडली होती. त्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले.

डॉ.जयवीरा यांनी शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली होती. परंतू फ्लाईट अटेंडेंटने त्यांना सांगितले की असे कोणतेही भोजन उपलब्ध नाही. त्यांना मांसाहारी भोजनच देण्यात आले. मांस हटवून खाण्याच्या सल्ला त्यांना दिला. परंतू मनाविरुद्ध असा प्रकार करताना त्यांचा श्वास कोंडू लागला. त्यांना प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. फ्लाईट क्रूने मदत करण्याचा प्रयत्न केला. विमान हजारो फूट उंचीवर असताना दूरस्थ आरोग्य सल्लागाराशी संपर्क केला गेला. परंतू जयवीरा यांचा प्रकृती ढासळतच गेली.

हलगर्जीपणामुळे कतार एअरवेजवर खटला

अखेर आपातकालिन स्थितीपासून हे विमान एडीनबर्ग, स्कॉटलँडमध्ये उतरवले गेले, नंतर डॉ. जयवीरा यांना रुग्णालयात नेण्यात आले. 3 ऑगस्ट, 2023 रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण एस्पिरेशन निमोनिया सांगण्यात आले. भोजन वा तरल पदार्थ फुप्फुसात गेल्याने होणारा हा गंभीर फुप्फुसाचा आजार आहे. त्यांचा मुलगा सुर्या जयवीरा यांनी कतार एअरवेजवर खटला दाखल केला आहे. ज्यात भोजन सेवा आणि आपत्कालिन उपचारात हलगर्जी दाखवल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

नुकसा भरपाई मागितली

या खटल्यात $128,821 नुसार भरपाई मागितली आहे. हलगर्जीने मृत्यूस जबाबदार प्रकरणातील किमान वैधानिक रक्कम आहे.या खटल्यात मॉन्ट्रियल कन्व्हेन्शनचा तरतूद आहे, ज्यात आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये अपघातांमुळे झालेल्या दुखापती किंवा मृत्यूसाठी कठोर दंडाची तरतूद आहे. कन्व्हेन्शनमध्ये जास्तीत जास्त $175,000 भरपाईची तरतूद आहे.

'आमच डोकं खराब आम्हाला मोदीच पाहिजे', NDA बहुमतावर राणा काय म्हणाल्या?
'आमच डोकं खराब आम्हाला मोदीच पाहिजे', NDA बहुमतावर राणा काय म्हणाल्या?.
बिहार निकालानंतर राऊतांच्या पहिल्या प्रतिक्रियेवर भाजपचं प्रत्युत्तर
बिहार निकालानंतर राऊतांच्या पहिल्या प्रतिक्रियेवर भाजपचं प्रत्युत्तर.
शिंदे म्हणाले, बिहारच्या लाडक्या बहिणींनी दिली लँडस्लाईड व्हिक्ट्री..
शिंदे म्हणाले, बिहारच्या लाडक्या बहिणींनी दिली लँडस्लाईड व्हिक्ट्री...
सुळेंकडून नितीशबाबूंचं कौतुक! बिहार निकालावर राज्यात कोण-काय म्हणालं?
सुळेंकडून नितीशबाबूंचं कौतुक! बिहार निकालावर राज्यात कोण-काय म्हणालं?.
भाजप नंबर1 चा पक्ष तरी नितीश कुमार CM होते अन् राहणार, JDUचा मोठा दावा
भाजप नंबर1 चा पक्ष तरी नितीश कुमार CM होते अन् राहणार, JDUचा मोठा दावा.
'ही' 5 कारणं ज्यामुळं बिहारमध्ये NDAची हवा, विजयामागे मोदींचा करिष्मा
'ही' 5 कारणं ज्यामुळं बिहारमध्ये NDAची हवा, विजयामागे मोदींचा करिष्मा.
विजय बिहारमध्ये जल्लोष राज्यात,दादांकडून पेढे तर चव्हाणांनी वाजवला ढोल
विजय बिहारमध्ये जल्लोष राज्यात,दादांकडून पेढे तर चव्हाणांनी वाजवला ढोल.
बिहार कल येताच राऊत म्हणाले; महाराष्ट्र पॅटर्न धक्का बसण्याची गरज नाही
बिहार कल येताच राऊत म्हणाले; महाराष्ट्र पॅटर्न धक्का बसण्याची गरज नाही.
NDA ला बहुमत... भाजपच्या मैथिली ठाकूर 8 हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर
NDA ला बहुमत... भाजपच्या मैथिली ठाकूर 8 हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर.
निकालापूर्वी कार्यकर्त्याचा जल्लोष, NDAच्या विजयामुळे बिहारमध्ये कल्ला
निकालापूर्वी कार्यकर्त्याचा जल्लोष, NDAच्या विजयामुळे बिहारमध्ये कल्ला.