AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral: अय अय्यो ! 10 रुपयांची नाणी देऊन विकत घेतली कार! वेत्रीवेल काका झाले व्हायरल…

तामिळनाडूतील एक व्यक्ती कार (Car Buying) खरेदी करण्यासाठी कार शोरूममध्ये पोहोचला. पण जेव्हा त्याने गाडी खरेदी करण्यासाठी जमा केलेली नाणी पोत्यातून बाहेर काढली, तेव्हा सगळ्यांचेच धाबे दणाणले. असे करण्यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. वेत्रीवेल असं या व्यक्तीचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. वेत्रीवेल म्हणाले की, तो एक शाळा आणि मेडिकल स्टोअर (Medical Store) चालवतो. तिची […]

Viral: अय अय्यो ! 10 रुपयांची नाणी देऊन विकत घेतली कार! वेत्रीवेल काका झाले व्हायरल...
वेत्रीवेल काका झाले व्हायरल...Image Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 20, 2022 | 4:16 PM
Share

तामिळनाडूतील एक व्यक्ती कार (Car Buying) खरेदी करण्यासाठी कार शोरूममध्ये पोहोचला. पण जेव्हा त्याने गाडी खरेदी करण्यासाठी जमा केलेली नाणी पोत्यातून बाहेर काढली, तेव्हा सगळ्यांचेच धाबे दणाणले. असे करण्यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. वेत्रीवेल असं या व्यक्तीचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. वेत्रीवेल म्हणाले की, तो एक शाळा आणि मेडिकल स्टोअर (Medical Store) चालवतो. तिची आईही एक छोटंसं दुकान चालवते. त्यांच्या दुकानात येणारे बहुतेक लोक 10-10 नाणी (10 Rupees Coins) देऊन काहीही खरेदी करतात. यामुळे वेत्रीवेलजवळ बरीच नाणी जमा झाली, तीही तो बँकेतून  बदलायला गेला.

शेवटी नाणी देऊन कार घ्यायची परवानगी

कधी असं पाहिलंय का कुणी खूप सारे चिल्लर देऊन गाडी विकत घेतलीये? विचार करा मंडळी कारण एका व्यक्तीने खरंच असं केलय. दहा रुपयाची नाणी किती महत्त्वाची असतात हे दाखवून देण्यासाठी त्याने हे केलय. तो आधी बँकेत गेला खरा पण बँक वाल्याने सांगितले तुझे हे नाणी मोजत बसायला आमच्याकडे लोकं नाहीत. मग तो वैतागून शोरूम मध्ये गेला. तिथेही बराच वेळ विनवण्या करून त्याला शेवटी नाणी देऊन कार घ्यायची परवानगी देण्यात आली.

 ते घेण्यास नकार

वेत्रीवेलच्या मते, बँकर्सनीही इतकी नाणी घेण्यास नकार दिला. नाणी न घेण्याचे कारणही बँकेने दिले. बँकेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे इतकी नाणी मोजायला लोकं नव्हते. पण रिझर्व्ह बँकेने त्यांना वैध ठरवले आहे, तर मग ते घेण्यास नकार का, असे वेत्रीवेल यांनी सांगितले. यामुळे नाराज झालेल्या या व्यक्तीने एका महिन्याच्या आत 6 लाख रुपयांपर्यंतची नाणी जोडली.

शेवटी मालकाने होकार दिला

शोरूममध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीला आधी गाडी आवडली आणि नंतर पैसे भरण्यासाठी नाणी घेण्याची त्याने विनंती केली. शोरूमच्या मालकाला समजावण्यासाठी त्या माणसाला थोडी मेहनत घ्यावी लागली तरी शेवटी मालकाने होकार दिला. त्याने गाडीतून पोत्यात भरलेली नाणी काढताच सर्वांनाच धक्का बसला. 10 रुपयांची नाणी निरुपयोगी नाहीत, हे लोकांना समजावून सांगायचे आहे, असे वेत्रीवेल यांनी सांगितले.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!