Viral: काही करतायत समर्थन तर काही विरोध! अग्निपथ योजनेच्या व्हायरल पोस्ट…

आंदोलनं झाली, निदर्शनं करण्यात आली,काही ठिकाणी तर हिंसाचार (Violence) देखील झाला. एखादी गोष्ट पटली नसेल तर नक्कीच भारतीय नागरिकाला या गोष्टीचा विरोध करण्याचा अधिकार (Rights) आहेच. परंतु हिंसाचाराचं समर्थन कुठल्याच बाबतीत केलं जाऊ नये, केलं जात नाही.

Viral: काही करतायत समर्थन तर काही विरोध! अग्निपथ योजनेच्या व्हायरल पोस्ट...
अग्निपथ योजनेच्या व्हायरल पोस्ट
Image Credit source: facebook
रचना भोंडवे

|

Jun 20, 2022 | 9:18 AM

नवी दिल्ली: 14 जूनला अग्निपथ योजने (Agneepath Scheme) ची घोषणा झाली. भारतीय तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलाच्या नियमित संवर्गात सेवा देण्याची मुभा या योजनेअंतर्गत देण्यात आली. देशात ठिकठिकाणी या योजनेचं स्वागत केलं गेलं. स्वागतही केलं गेलं आणि विरोधही प्रचंड करण्यात आला.आंदोलनं झाली, निदर्शनं करण्यात आली,काही ठिकाणी तर हिंसाचार (Violence) देखील झाला. एखादी गोष्ट पटली नसेल तर नक्कीच भारतीय नागरिकाला या गोष्टीचा विरोध करण्याचा अधिकार (Rights) आहेच. परंतु हिंसाचाराचं समर्थन कुठल्याच बाबतीत केलं जाऊ नये, केलं जात नाही. उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, तेलंगण, ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, पंजाब, झारखंड, आसामसह विविध राज्यांमध्ये योजने विरोधात निदर्शने सुरू झाली.

अग्निपथ योजनेसंदर्भात सोशल मीडियावर काही गोष्टी व्हायरल

काही ठिकाणी आंदोलन तीव्र होताच निदर्शकांनी गाड्यांना आग लावणे, वाहने जाळणे आणि खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणे या दोन्ही गोष्टींचा भडिमार केला. या गोष्टींचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारची असतात. सोशल मीडियाचं महत्त्व वेगळं सांगायची गरज आहेका? सोशल मीडियावर सुद्धा प्रत्येक घटनेविषयी चर्चा केली जाते. मिम्स बनवले जातात. तो ही आंदोलनाचा एक भाग असतो. अग्निपथ योजनेसंदर्भात सोशल मीडियावर सुद्धा काही गोष्टी व्हायरल झाल्या. इथेही लोकांनी विरोध दर्शवला, स्वागत केलं, सरकारविरोधात घोषणा झाल्या, सगळं झालं. काय आहेत अग्निपथ योजनेसंदर्भातल्या व्हायरल गोष्टी बघुयात…

इतक्या गोंधळात ताईंना स्पेलिंग विषयी पडलेला प्रश्न व्हायरल होतोय

बऱ्याच लोकांनी अग्निपथचं स्वागत सुद्धा केलंय! लोकं व्यक्त होताना दिसतात<

राजकीय नेत्यांची भाषणं या निमित्तानं व्हायरल केली जातायत

पंतप्रधानांवर विश्वास व्यक्त करून योजनेला समर्थन

काहींनी ही तरुणांसाठी कशी चांगली संधी आहे हे सांगितलंय

हे सुद्धा वाचा

आनंद महिंद्रा यांनी या योजनेचं स्वागत केलंय

“अग्निपथ योजनेमुळे झालेल्या हिंसाचारामुळे दु:ख झाले आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेची घोषणा करण्यात आली, तेव्हा मी म्हणालो होता आणि आताही मी पुन्हा तेच सांगतो की या योजनेअंतर्गत अग्निवीरांना मिळणारी शिस्त आणि कौशल्ये त्यांना रोजगारक्षम बनवतील. महिंद्रा ग्रुप अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांची भरती करण्याच्या संधीचे स्वागत करतो.” हे ट्विट केलंय महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी. आनंद महिंद्रा यांनी या योजनेचं स्वागत केलंय आणि योजनेनं तरुणांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें