गौतमीला टक्कर देणारी ही डान्सर कोण? जिच्या स्टेप पाहून चाहते थक्क, Video होतोय प्रचंड व्हायरल

सध्या सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र, आता एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामधील डान्स पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

गौतमीला टक्कर देणारी ही डान्सर कोण? जिच्या स्टेप पाहून चाहते थक्क, Video होतोय प्रचंड व्हायरल
| Updated on: May 11, 2026 | 7:27 PM

Viral Dance Video : सोशल मीडियावर सध्या डान्स व्हिडीओंचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर दररोज हजारो डान्स व्हिडीओ व्हायरल होत असून, अनेक तरुणी या माध्यमातून लोकप्रियता मिळवत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वेगळ्या डान्स स्टेप्स आणि मंचावरील सादरीकरणामुळे चर्चेत आलेली गौतमी पाटील ही सोशल मीडियावरील चर्चेचा केंद्रबिंदू ठरली होती. तिच्या कार्यक्रमांनंतर आता अनेक नव्या डान्सर्सदेखील सोशल मीडियावर सक्रिय झाल्या आहेत.

यामध्ये राधा पाटील हिचे नावही मोठ्या प्रमाणात समोर आले. तिच्या डान्स व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आणि लाईक्स मिळत असून, अनेक चाहते तिच्या स्टाइलचे कौतुक करताना दिसतात. मात्र, दुसरीकडे सोशल मीडियावर डान्सच्या नावाखाली अश्लील हावभाव आणि वादग्रस्त स्टेप्स दाखवल्या जात असल्याची टीकाही वाढत आहे.

दरम्यान, सध्या इंस्टाग्रामवर एक डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी विविध गाण्यांवर वेगवेगळ्या स्टेप्स करताना दिसत आहे. तिच्या हटके डान्स स्टाइलमुळे हा व्हिडीओ अल्पावधीतच लाखो लोकांपर्यंत पोहोचला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली असून, अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओचे कौतुक केले असले, तरी अनेकांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “काय चाललंय आणि काय बोलायचं… निशब्द झालो मी”, “लय भारी काम चालू आहे”, “येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार दिले जात आहेत व्वा”, अशा उपरोधिक प्रतिक्रिया काहींनी दिल्या आहेत. तर “महाराष्ट्राचं पूर्ण यूपी-बिहार करून टाकलंय” अशी टीकाही काही यूजर्सनी केली आहे.

सोशल मीडियामुळे अनेक कलाकारांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळत असली, तरी कंटेंटच्या दर्जाबाबत आणि त्याच्या समाजावर होणाऱ्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः तरुण पिढीवर अशा व्हिडीओंचा प्रभाव पडत असल्याने, मनोरंजन आणि अश्लीलता यामधील सीमारेषा पाळली जावी अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे. दरम्यान, व्हायरल होणाऱ्या अशा व्हिडीओंमुळे सोशल मीडियावरील कंटेंटबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

Follow Us