गोव्यातील ‘या’ चहाचा सोशल मीडियावर भलताच बोलबाला, स्वाद घेण्यासाठी पर्यटकांच्या लागतायत रांगा

| Updated on: Nov 05, 2022 | 10:54 PM

या चहाचा व्हिडिओ ट्विटर आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाच्या फ्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांची पावले गोव्याकडे वळली आहेत.

गोव्यातील या चहाचा सोशल मीडियावर भलताच बोलबाला, स्वाद घेण्यासाठी पर्यटकांच्या लागतायत रांगा
गोव्यातील 'या' चहाचा सोशल मीडियावर भलताच बोलबाला
Image Credit source: social
Follow us on

गोवा : गोव्याला जायचं म्हटलं की कोणीही एका पायावर तयार होतं. गोव्याचे सौंदर्य आणि तिथला परदेशी पर्यटकांचा असलेला वावर अनेकांना आकर्षित करतो. मद्यपी आणि पर्यटकप्रेमी असलेल्यांसाठी तर गोवा हे पहिल्या पसंतीचे ठिकाण असते. सध्या याच पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यामध्ये एका चहाची भारी चर्चा रंगली आहे. या चर्चेचे कारणही तसेच आहे. दारूचा स्वाद असलेली ही चहा पिण्यासाठी केवळ चहाशौकीनच नव्हे तर मद्यप्रेमींची ही पावले वळू लागली आहेत. दारूचा स्वाद असलेली ही चहा सोशल मीडियामध्ये देखील भलतीच लोकप्रिय ठरली आहे.

सोशल मीडियावर चहाचा व्हिडिओ व्हायरल

या चहाचा व्हिडिओ ट्विटर आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाच्या फ्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांची पावले गोव्याकडे वळली आहेत. सलग सुट्ट्यांचा योग साधत बरेच जण गोव्याकडे वळले आहेत.

हे सुद्धा वाचा

चहाला ‘ओल्ड मोंक टी’ असे नाव

भारतात चहाप्रेमींची काही कमी नाही. सध्याच्या घडीला तर आपणाला नाक्यानाक्यावरील चहाच्या टपऱ्यांबरोबरच चहाचा कॉर्पोरेट बिझनेस देखील पाहायला मिळत आहे. काही लोकांना आल्याचा चहा, तर काही लोकांना आणखी कुठल्या फ्लेवरचा चहा आवडतो.

चहाप्रेमी आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वेगवेगळ्या फ्लेवर टेस्ट करून पाहतात. गोव्यातील दारूचा स्वाद असलेला चहादेखील अशाच हटके चहांपैकी एक आहे. या चहाला ‘ओल्ड मोंक टी’ असे नाव देण्यात आले आहे. कारण हा चहा ओल्ड मोंक रम टाकून बनवण्यात येत आहे. त्यामुळे ज्या लोकांना रम अधिक प्रमाणात आवडते, ते दारूशौकीन आवर्जून या चहाकडे वळताना दिसत आहेत.

सिंक्वेरिम बीचवर उपलब्ध हा चहा

गोव्याच्या समुद्रकिनारी बरीच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आहेत. सर्वच किनाऱ्यावरील हॉटेल्समध्ये पर्यटकांची तोबा गर्दी झालेली असते. दारूचा स्वाद असलेला विशेष चहा कैंडोलिम येथील सिंक्वेरिम बीचवर विकला जात आहे. या चहाला ग्राहकांची दिवसागणिक वाढती पसंती आहे. जो जो पर्यटक हा चहा पिऊन जात आहे, तो तो पर्यटन आपल्या मित्रमंडळींनाही चहाची एकदा टेस्ट करून पाहण्याचा सल्ला देत आहे.

चहाची रेसिपी ट्विटरवर शेअर

ट्विटरवर या चहाची रेसिपी शेअर करण्यात आली आहे. चहा बनवण्याची पद्धत फारच आकर्षक वाटते आहे. काहीजणांनी तर चहाचा व्हिडिओ बघून स्वतःच अशा प्रकारचा विशेष चहा बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.