Video : बुडणाऱ्या हरणाच्या पाडसाला सैनिकाकडून जीवनदान, व्हायरल व्हिडीओने जिंकली सर्वांचीच मनं
सोशल मीडियावर Buitengebieden नावाच्या एका युजरने 11 जून रोजी एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ युजर्सना कमालीचा आवडला आहे.

मुंबई : सध्या कोरोनाचं संकट आणि आसपासच्या टेन्शनयुक्त वातावरणात प्रत्येकालाच सकारात्मक व्हिडीओ पाहायला आवडतात. त्यात प्राण्यांना वाचवणारे किंवा प्राणी आनंदी असणारे व्हिडीओ लगेचच व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक सैनिक हरणाच्या पाडसाला वाचवत आहे. हा व्हिडीओ नेटवर येताच प्रचंड व्हायरल झाला असून सैनिकाने सर्वांचीच मनं जिकली आहेत. (Video Of Soldier Saving Drowning baby Fawn Goes Viral Netizens Loved the Viral Video Somuch)
काय आहे व्हिडीओ?
सोशल मीडियावर हा व्हिडीओ Buitengebieden नावाच्या एका युजरने 11 जून रोजी पोस्ट केला. आतापर्यंत 44 हजारहून अधिकवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. या व्हिडीओमध्ये एका तलावात एक झाड पडलेलं दिसून येतंय ज्यावरुन घसरुन एक हरणाचं पाडस पाण्यात पडलं आहे. त्याचवेळी तेथे एक सैनिक येऊन त्या बुडणाऱ्या हरणाच्या पाडसाला सुखरुपने पाण्याबाहेर काढतो. हरणाला वाचवण्यासाठी सैनिक हळूहळू तुटलेल्या झाडावरुन सरकत पाण्याच्या मध्यभागी जातो आणि पाडसाला वाचवतो.
लोकांकडून प्रेमाचा वर्षाव
या व्हिडीओला नेटकरी तुफान व्हायरल करत आहेत. सोबतच या व्हिडीओला शेअर करताना कमेंट करुन आपले सैनिकाप्रतीचे प्रेम दर्शवत आहेत. आतापर्यंत हजारो युजर्सने हा व्हिडीओ पाहून लाईक
देखील केला आहे. यातीलच काही हटके कमेट वाचा.
हे ही वाचा :
Video | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल
Video | पाणी पिण्यासाठी जीव व्याकूळ, तहानलेल्या हत्तीचा संयम एकदा पहाच !
(Video Of Soldier Saving Drowning baby Fawn Goes Viral Netizens Loved the Viral Video Somuch)