VIDEO : तरूणाची खतरनाक स्टंटबाजी, नेटकरी म्हणाले व्हिडीओ पाहून पोटात गोळाच आला!

सोशल मीडियावर हजारो व्हिडीओ (Video) व्हायरल होतात. त्यामध्ये जास्त करून स्टंटचे (Stunts) व्हिडीओ असतात. काही व्हिडीओमध्ये तर इतके खतरनाक स्टंट केले जातात, की ते पाहून सर्वांनाच मोठा आर्श्चयाचा धक्काच बसतो. तरुणांनी वेगवेगळे थरारक स्टंट केलेले व्हिडीओ आवडीने पाहते.

VIDEO : तरूणाची खतरनाक स्टंटबाजी, नेटकरी म्हणाले व्हिडीओ पाहून पोटात गोळाच आला!
तरूणाचा स्टंट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 12:34 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) हजारो व्हिडीओ (Video) व्हायरल होतात. त्यामध्ये जास्त करून स्टंटचे (Stunts) व्हिडीओ असतात. काही व्हिडीओमध्ये तर इतके खतरनाक स्टंट केले जातात, की ते पाहून सर्वांनाच मोठा आर्श्चयाचा धक्काच बसतो. तरुणांनी वेगवेगळे थरारक स्टंट केलेले व्हिडीओ आवडीने पाहते. सध्या तर एक खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये स्टंटबाजी करताना एक तरूण दिसतो आहे.

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरूण डोंगरावर उभा आहे. त्यानंतर तो अचानकच बॅकफ्लिप करतो आणि थोडा खाली जातो. हे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. कारण थोडीशी जरी चूक झाली असती तर तो तरूण थेट शेकडो फूट खाली पडला असता. हा व्हिडिओ parkour_tribe नावाच्या अकाऊंटवरून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, वेबस्टर डाउनहिल. एक दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला 11 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

इथे पाहा तरूणाचा स्टंट करतानाचा व्हिडीओ! 

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सने संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘भाई जर थोडी जरी चूक झाली असती तर खड्ड्यात पडला असता, तर कदाचित या व्हिडिओला आणखी लाइक्स मिळाले असते.’ काय अडचण आहे. सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे लोक जीवाशी खेळायला तयार असतात, असे युजरने लिहिले. आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या पोटात तर गोळाच आला. हा व्हिडीओ बघितल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक केले आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : लग्न मंडपामध्ये येणाऱ्या नवरीला पाहून नवरदेवाला आली चक्कर, पुढे काय झाले पाहा व्हिडीओमध्ये!

शाळेतल्या मुलांचा हा अतरंगी व्हिडिओ पाहिला का? एवढी मस्ती कुणी केली असेल का? Video viral