VIDEO : अन् पाहता पाहताच दोन सिंहांनी पांढऱ्या गाडीला घेरलं, पुढे झालं असं काही

या व्हिडीओमध्ये तीन सिंहांनी पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीला घेरल्याचं पाहायला मिळतंय. एक सिंह तर थेट गाडीवरच चढला होता. आजूबाजूला इतरही गाड्या उभ्या होत्या, पण कोणीही त्यांच्या जवळ गाडी नेण्यास धजावत नव्हते. हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांता नंदा यांनी ट्विटवर हा व्हिडीओ शेअर केलाय.

VIDEO : अन् पाहता पाहताच दोन सिंहांनी पांढऱ्या गाडीला घेरलं, पुढे झालं असं काही
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 11:20 PM

नवी दिल्लीः व्याघ्र प्रकल्पातील एखाद्या सफारीदरम्यान वाघ दिसणं ही तशी साधी बाब आहे. अनेकदा व्याघ्र सफारीवर असताना वाघ पाहण्यासाठी आपले डोळे आसुसलेले असतात. कुठल्या झाडाच्या मागे किंवा झुडपात एखादा वाघ पहुडलेला पाहायला कधी मिळतोय, असं आपल्याला होतं. पण अचानक वाघ किंवा सिंहानं तुमच्या गाडीलाच घेरलं तर?, होय हे खरं आहे. सोशल मीडियावर अशाच एका गाडीला सिंहांनी घेरलेल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

तीन सिंहांनी पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीला घेरलंय

या व्हिडीओमध्ये तीन सिंहांनी पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीला घेरल्याचं पाहायला मिळतंय. एक सिंह तर थेट गाडीवरच चढला होता. आजूबाजूला इतरही गाड्या उभ्या होत्या, पण कोणीही त्यांच्या जवळ गाडी नेण्यास धजावत नव्हते. आयएफएस अधिकारी सुशांता नंदा यांनी ट्विटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. तो आतापर्यंत 10 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. जवळपास 1500 हून अधिक लोकांना त्याला लाईक केलेय. त्यानंतर अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कमेंटही केल्यात. माझ्यासोबत असं व्हावे, अशी कधीच इच्छा करणार नाही. तर दुसऱ्या एका युजर्सने सांगितले की, या गाड्यांच्या आत बसलेल्या लोकांचं हृदय जोरजोरात धडकत असेल. सर्व सुरक्षित असतील, अशी मी आशा करतो.

इतर दोन जण जमिनीवर मोर्चा सांभाळतायत

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, तीन भल्या मोठ्या सिंहांनी पांढऱ्या रंगाच्या एसयूव्ही कारला घेरलंय, एक सिंह तर थेट कारच्या बोनेटवर चढलाय. इतर दोन जण जमिनीवर मोर्चा सांभाळताना पाहायला मिळत आहेत. बोनेटवर चढलेला सिंह गाडीची साईड मिरर खाण्याचाही प्रयत्न करतोय. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर शहारा येईल. त्यामुळे तुम्हाला कल्पना आलीच असेल की, आत बसलेल्या लोकांचे काय हाल झाले असतील.


संबंधित बातम्या

आनंद पोटात माझ्या माईना! घरी आलेल्या नव्या पाहूण्याला पाहून कुत्रा खुश

बापरे! विजेच्या तारेला लटकला साप, लोक म्हणतात हा इथं कसा गेला ?

VIDEO: Two lions surrounded two vehicles, something happened next