अंगावर काटा आणणारा तैवानचा भूकंप! इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Sep 18, 2022 | 5:33 PM

अमेरिकेच्या त्सुनामी वॉर्निंग सेंटरने त्सुनामीचा इशारा दिला असून तैवानच्या समुद्र किनाऱ्याजवळ त्सुनामीच्या धोकादायक लाटा उसळू शकतात, असं म्हटलं आहे.

अंगावर काटा आणणारा तैवानचा भूकंप! इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल
Taiwan Earthquake Viral
Image Credit source: Social Media
Follow us on

तैवानच्या आग्नेय भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे तैवानचं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या, पूल तुटले, रेल्वेचे डबेही उलटले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी हे भूकंप 6.8 तीव्रतेचे होते, तर अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार या भूकंपाची तीव्रता 7.2 इतकी आहे. त्याचबरोबर भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या 10 किलोमीटर खाली होते, असेही त्यांनी सांगितले आहे.

अमेरिकेच्या त्सुनामी वॉर्निंग सेंटरने त्सुनामीचा इशारा दिला असून तैवानच्या समुद्र किनाऱ्याजवळ त्सुनामीच्या धोकादायक लाटा उसळू शकतात, असं म्हटलं आहे.

त्याचबरोबर जपानच्या हवामान खात्यानेही असाच इशारा दिला आहे. एक मीटर उंचीच्या त्सुनामी लाटा इथे तयार होऊ शकतात, असंही त्यांचं म्हणणं आहे.

या भूकंपाशी संबंधित विविध व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात भूकंपाने कोणत्या प्रकारची नासधूस केली आहे हे लक्षात येतं. बघुयात व्हिडीओ…

तैवानमध्ये गेल्या दोन दिवसांत 100 हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे रेल्वेसेवांसह सार्वजनिक सेवांवर गंभीर परिणाम झाला आहे. तर अनेक ठिकाणी मेट्रो तात्पुरती बंद करण्यात आलीये.