
एका दुकानात लादीवर आरामात मुली झोपल्या या व्हिडीओत दिसत आहेत. थकलेल्या या मुलींपैकी एक मुलगी आडवी पडून मोबाईल पाहात आहे तर दुसरी मुलगी झोपलेली असल्याचे या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर अचानक झोपलेल्या मुलीच्या पॅण्टमध्ये एक उंदीर अचानक शिरतो. त्यानंतर जे झाले ते पाहून तुम्हालाही हसु येईल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिजन्स या मुलीची फजिती पाहून मजा घेत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाहू शकता की दोन मुली आपल्या बुटीकमध्ये दुपारच्या सहज आडव्या पडल्या आहेत. एक मुलगी फोन पाहण्यात बिझी आहे.आणि दुसरी मुलगी दमलेली असावी म्हणून ती दुपारची एक झोप काढत आहे. त्यानंतर एक उंदीर अचानक आला आणि त्या झोपलेल्या मुलीच्या पॅण्टमध्ये शिरला त्यानंतर जो हंगामा झाला तो पहाण्यासारखा आहे.
तुम्ही पाहाल कसा एक उंदीर अचानक झोपलेल्या मुलीच्या पॅण्टमध्ये अचानक शिरत असल्याचे दिसत आहेय. त्यामुळे ही मुलगी हडबडून उठते आणि संपूर्ण दुकानात अक्षरश: उड्या मारत असताना दिसत आहे. या मुलीची अवस्था पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. आपल्या सहकारी मैत्रीणीची ही अवस्था पाहून तिच्या शेजारी झोपणाऱ्या मुलीलाही हसु आवरले नाही. ती जोरजोराने हसू लागली. काही वेळाच्या महत्प्रयत्नाने हा उंदीर महाशय या मुलीच्या पॅण्टमधून बाहेर निघून दुसरीकडे पळताना दिसत आहे.
@ngakaksehat इंस्टाग्राम हँडलवरुन शेअर झालेला व्हिडीओ व्हीएतनामचा असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाख १६ हजार लोकांनी लाई्क्स केले आहे. नेटीजन्स या व्हिडीओला खूप मजेशीर कमेंट्स दिलेले आहेत.
मुलीसोबत घडला मजेशीर अपघात, उंदीर पॅण्टमध्ये घुसला !
एका युजरने लिहिलेय की, उंदीर घुसतात मुलगी गंगम स्टाईल डान्स करायला लागली. दुसरे एका युजरने मजेने म्हटलेय की उंदराने तर दीदीचा जीवच घेतला असता ! हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.