viral : कसं? लग्नाच्या आधी आनंदी होता की नंतर? पुरुषांना सोडा, महिलांनी काय उत्तर दिलीत ती वाचाच
तुम्ही लग्नाच्या आधी जास्त खुश होता की लग्नाच्या नंतर खुश आहात. या प्रश्नावर पुरुष आणि महिलांच्या प्रतिक्रीयांना सोशल मीडियावर खूप खळबळ उडाली आहे. या व्हिडीओने अनेकांना विचार करण्यास प्रवृत्त केले आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, आता लग्न झालेल्या जोडप्यांबद्दल एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओत रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना एक व्यक्ती थेट प्रश्न विचारत आहे. लग्नाआधी खूष होता की लग्नानंतर खूष आहात ? या संदर्भात या प्रश्नाला महिलांनी आणि पुरुषांनी दिलेल्या उत्तराने खळबळ माजली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत व्यक्ती वेगवेगळ्या वयोगटातील पुरुषांना हा प्रश्न विचारतो तेव्हा त्या सर्वांची प्रतिक्रीया जवळपास एकसारखीच असते. बुजुर्गपासून ते तरुणांपर्यंत सर्वांचे एक म्हणणं आहे की लग्ना आधी ते जास्त खुष होते. यामागचे कारण सांगताना ते लग्नानंतर जबाबदारी वाढते असे सांगतात.
एक बुजुर्ग रिक्षा चालकाने तर आपल्याला ८ मुले असल्याचे सांगितले. परंतू कोणीही आर्थिक रुपाने मला मदत करीत नाही.त्यामुळे या वयातही मला काम करावे लागत असून संघर्ष सुरुच असल्याचे या रिक्षा वाल्याने सांगितले. पुरुषांच्या एकसाची उत्तराने नेटिजन्स विचार करण्यास प्रवृत्त झाले आहेत की लग्न केल्यानंतर पुरुष का आनंदी राहू शकत नाहीत.
पुरुषांना काय दिले उत्तर येथे पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
तसेच या व्हिडीओच्या दुसऱ्या पार्टमध्ये हाच प्रश्न महिलांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांच्या प्रतिक्रीया मिळती जुळती राहीली. काही महिलांनी सांगितले की लग्नाआधी त्या जास्त आनंदी होत्या. तर अनेक महिलांनी लग्नानंतर आयुष्य अधिक चांगले झाल्याचे म्हटले आहे. परंतू एका महिलेचे उत्तर वेगळे होते. ज्यामुळे अनेक नेटीजन्स भावूक झाले.
एका महिलेच्या उत्तराने लोक झाले भावूक येथे पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
‘घरी जाऊन धुलाई होणार’
@nirajyadav0.21 इंस्टाग्राम हँडल अलिकडेच या दोन्ही व्हिडीओना शेअर केलेले आहे. यावर निरनिराळ्या प्रतिक्रीया येत आहेत. एका युजरने आता यांची घरी गेल्यावर धुलाई होणार आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की भैया सिंगल रहाण्यातच भलाई आहे. अन्य एका युजरने सांगितले की त्या महिलेच्या दु:खाला समजून घ्या ज्या लग्ना आधी आणि लग्नानंतरही दु:खी आहेत.
