वरुण धवनच्या ‘Jaaneman Aah’ गाण्यावर अमेरिकन मॉडेलचा डान्स, व्हिडीओची सोशल मीडियावर धूम

बॉलिवूड गाण्याचा फीव्हर फक्त भारतीयांपर्यंत मर्यादित नाही तर याचा असर हॉलिवूडवरही (Dance Video Of American Model Chrissy Teigen) पाहायला मिळतो.

वरुण धवनच्या ‘Jaaneman Aah’ गाण्यावर अमेरिकन मॉडेलचा डान्स, व्हिडीओची सोशल मीडियावर धूम
Chrissy Teigen

मुंबई : बॉलिवूड गाण्यांचा फीव्हर फक्त भारतीयांपर्यंत मर्यादित नाही तर याचा असर हॉलिवूडवरही (Dance Video Of American Model Chrissy Teigen) पाहायला मिळतो. याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे अमेरिकन मॉडल आणि टीव्ही पर्सनॅलिटी Chrissy Teigen चा आहे. Chrissy सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते. ती स्वत:बाबत सर्व अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच तिने बॉलिवूड स्टार वरुण धवन आणि अभिनेत्री परिणीति चोप्राचं गाणं ‘जानेमन आह’ वर डान्स केला आहे (Viral Dance Video Of American Model Chrissy Teigen On Bollywood Dance Number Jaaneman Aah).

सोशल मीडियाच्या जगात व्हायरल होणाऱ्या या या डान्स व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पंसत केलं जात आहे. या व्हिडीओमध्ये न्युयॉर्कच्या एक भारतीय रेस्टॉरंटमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला शेअर करत तिने कॅप्शन दिलं की, ‘या शोसाठी सन्मान, मला आपल्यासोबहत ठेवल्याबद्दल थँक्यू.’

पाहा Chrissy हा व्हिडीओ –

हे गाणं वरुण धवनच्या ‘ढिशूम’ या सिनेमाचं आहे. हा सिनेमा वरुणचा भाऊ रोहित धवनने दिग्दर्शित केलं आहे. या सिनेमात वरुण धवन व्यतिरिक्त अभिनेत्री परिणीति चोप्रा, जॅकलीन फर्नांडिस आणि जॉन अब्राहम, अक्षय खन्ना हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाचं हे गाणं ‘जानेमन आह’ खूप लोकप्रिय झालं होतं.

यापूर्वीही Chrissy ने अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यामुळे चर्चेत होती. जो बाइडेनने ट्विटरवर Chrissy ला अनफॉलो केलं होतं. त्यानंतर मॉडल Chrissy ने स्वत: राष्ट्रपतींना असं करण्यास सांगितलं असल्याचं पुढे आलं होतं.

Viral Dance Video Of American Model Chrissy Teigen On Bollywood Dance Number Jaaneman Aah

संबंधित बातम्या :

International Women’s Day 2021 | जगात महिलांचे स्थान उल्लेखनीय, गुगलकडून नारीशक्तीचा अनोखा सन्मान

OMG! अचानक सोन्याचा डोंगर सापडला; लोकांची सोनं लुटण्यासाठी अलोट गर्दी, व्हिडीओ व्हायरल

8 वर्षाच्या मुलाने गेम खेळून 24 लाख रुपये कमावले, तुम्हालाही हा गेम हमखास जमेल?

Published On - 10:17 am, Mon, 8 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI