वडिलांना ट्रेनमध्ये बसवून निघालेल्या मुलाला टीसीने थांबवलं अन्…; पुढे जे घडलं ते जाणून तुम्ही थक्क व्हाल!
एक मुलगा आपल्या वडिलांना रेल्वेगाडीत बसवून परतत असताना, स्टेशनच्या गेटवर एका टीसी ने (TC) त्याला अडवले. त्यानंतर जे घडले, ते पाहून तुम्ही थक्क व्हाल.

अनेकदा आपण आपल्या कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना किंवा प्रियजनांना ट्रेन स्टेशनला सोडायला किंवा घेण्यासाठी जातो. पण एक वेगळीच घटना समोर आली आहे. एक मुलगा आपल्या वडिलांना ट्रेनमध्ये बसवून आपल्या घरी परतत असताना स्टेशनच्या बाहेर टीसीने थांबवलं. अशावेळी काय होईल? असंच काहीसं एका युवकांसोबत झालं. ज्यानंतर सोशल मीडियावर रेल्वेच्या नियमनाबद्दल चर्चा आणि वाद सुरु झाला. ही स्टोरी व्हायरल झाली आहे.
नेमकं काय घडलं?
खरं तर सोशल मीडिया x वर एक पोस्ट व्हायरल झाली. ‘पिंकी प्रज्ञा’ नावाच्या एका युजरने तिच्या चुलत भावाशी संबंधित एक घटना पोस्ट करत शेअर केली. पिंकीने सांगितले की, तिचा चुलत भाऊ त्याच्या वडिलांना रेल्वेने निरोप देण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेला होता. गाडी सुटल्यानंतर, तो स्थानकाच्या आवारातून बाहेर पडत असताना, एका टीटीईने त्याला थांबवले आणि त्याच्याकडे तिकीट मागितले.
पिंकीने लिहलेल्या पोस्टनुसार तिच्या भावाने टीटीईला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला की तो ट्रेनमधून प्रवास करून आलेला नाही. तो फक्त आपल्या वडिलांना ट्रेनमध्ये सोडायला आला होता आणि आता परत घरी जात होता. मात्र, टीटीईने त्याचे म्हणणे अजिबात ऐकून घेतले नाही. टीटीईचा आरोप होता की, स्टेशनवर नुकतीच एक ट्रेन आली आहे आणि हा तरुण विनातिकीट प्रवास करून त्यातून खाली उतरला आहे.
पिंकीने उपस्थित केले प्रश्न
घडलेल्या प्रकाराबद्दल पिंकीने प्रश्न उपस्थित केले की, रेल्वे स्टेशनवर दिवसभरत हजरो ट्रेन येतात आणि जातात. मग अशावेळी स्टेशनच्या बाहेर कोणी पडत आहे याचा अर्थ असा की होत नाही ना की तो ट्रेनमधून उतरलेला आहे. हे कितपत योग्य आहे? आपल्या प्रियजनांना सोडण्यासाठी किंवा त्यांना घेण्यासाठी स्टेशनवर येणाऱ्या लोकांना अशा अडचणींचा सामना करावा लागेल का, असा प्रश्न तिने उपस्थित केला.
युजर्स काय म्हणाले?
पिंकीची पोस्ट व्हायरल होताच त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. सोशल युजर्सने बहुतांश युजर्सनी तिच्या मताशी असहमती दर्शवली आणि तिला रेल्वेच्या नियमांची आठवण करून दिली. त्यांनी असा युक्तिवाद केला की, रेल्वेचे नियम नीट समजून न घेता त्यावर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. दोन प्रकारच्या तिकिटांमधील फरक अगदी सोप्या शब्दांत स्पष्ट करत एका युजरने लिहिले की, रेल्वेचे तिकीट प्रवाशांसाठी असते, तर प्लॅटफॉर्म तिकीट अशा लोकांसाठी असते जे आपल्या प्रियजनांना निरोप देण्यासाठी किंवा त्यांना आणण्यासाठी येतात. जर तसे नसते, तर मग रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटे जारीच का केली असती?
एकंदरीत पिंकीला तिने लिहलेल्या पोस्टवरून चांगलंच ट्रोल केलं गेलं.