मृत्यूच्या शेवटच्या क्षणी रुग्णाने नर्सला बोलले फक्त 6 शब्द, ऐकताच तिने त्वरित सोडली नोकरी; कारण…
सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका व्हायरल स्टोरीने तुम्ही थक्क व्हाल. एका नर्सने केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

हॉस्पिटल जेवढं शांत वाटतं तेवढंच ते खूप भीतीदायक असते. आपल्या जवळच्यांना गमावण्याची भीती अनेकांना असते. शिवाय या ठिकाणी अशी काही रहस्य दडलेली असतात की ज्याने तुम्हाला धक्का बसू शकतो. असाच काहीसा एक किस्सा एक नर्सने शेअर केला आहे. तिचा हा किस्सा सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झाला आहे. यामुळे लोकांना धक्का बसला आहे. त्या नर्स महिलेने असा दावा केला आहे की तिला एका रुग्णाने त्यांच्या शेवटच्या क्षणी असे काही ६ शब्द बोलले ज्यामुळे तिने लगेचच नोकरी सोडली. नेमकं काय घडलं हे सविस्तपणे जाणून घ्या.
मध्यरात्री सुरु झाला भीतीदायक खेळ
डेली स्टार यूकेच्या रिपोर्टनुसार ही भीतीदायक घटना मध्यरात्री उघडकीस आली. टिकटॉक वरच्या मारिसा नावाच्या युजरने मेडिकल स्टाफला त्यांच्या सर्वात भीतीदायक घटनेबद्दल सांगायला सांगितले. तेव्हा त्या नर्सने सांगितलं त्यानं सोशल मीडियावर खळबळ उडाली. जवळपास रात्रीच्या २.३० वाजता ही घटना घडली. हॉस्पिटलमध्ये भरती असलेली एक महिला रुग्ण एका रिकाम्या खुर्चीकडे एक तर्क बघायला लागली. नर्सने विचारलं काय झालं तर ती म्हणाली, ही खुर्ची फिरवू शकतेस का?
तेव्हा नर्सने तिला कारण विचारलं, ज्यावरच उत्तर ऐकून तिच्या अंगावर काटा आला. तिने संगीतलं क, त्या खुर्चीवर एक छोटा मुलगा माझ्याकडे बघून मला एकटक बघत आहे आणि हसतही आहे. मला त्याचे दात आवडत नाहीयेत. नर्सने याकडे रुग्णाची कल्पनाशक्ती म्हणून दुर्लक्ष केले, खुर्ची भिंतीच्या दिशेने फिरवली आणि ती निघून गेली.
वीस मिनिटांनंतर, रुग्णाने कॉल बेल वाजवली अन्…
जवळपास 20 मिनिटांनंतर याच रुग्णाने इमर्जन्सी कॉल बेल वाजवली. नर्स धावत आत आली आणि तेव्हा बघितलं की ती महिला खूप रडत होती. तिने थरथतच सांगितलं की, तू खुर्ची फिरवला नको हवी होतीस. त्यावेळी नर्सने कारण विचारले असता, मृत्यूच्या काही क्षण आधी त्या महिला रुग्णाने सहा अंगावर काटा आणणारे शब्द उच्चारले: “आता, तो तुमच्या मागे उभा आहे.”
अहवालानुसार, एवढेच घडले. भीतीपोटी त्या नर्सने मागे वळूनही पाहिले नाही. काही तासांनंतर, पहाटे ३:१७ च्या सुमारास, त्या महिला रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला.
नंतर सापडली चिट्ठी
ती रुग्ण गेल्यावर तिची खोली साफ करत असताना, एका नर्सला रुग्णाच्या उशीखाली दुमडलेला कागदाचा तुकडा सापडला. त्यावर लिहिले होते: “तो काही लहान मूल नाही. तो फक्त खाली वाकतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा चेहरा दिसावा.”
घटनेशी आहे जुने कनेक्शन!
ही घटना तीन महिन्यांपूर्वी त्याच खोलीत झालेल्या एका ७ वर्षांच्या मुलाशीच्या मृत्यूशी संबंधित होती. हे समजल्यावर रुग्णालयातील कर्मचारी थक्क झाले. या संपूर्ण प्रकारामुळे अत्यंत अस्वस्थ झालेली ती नर्स रुग्णालयातील आपली नोकरी कायमची सोडून देण्याचा निर्णय घेते. मात्र, तिचा धक्का अधिकच वाढला जेव्हा ती शेवटच्या वेळी तिथून बाहेर पडत असताना, एका सुरक्षा रक्षकाने तिला विचारले, “हा लहान मुलगा नेहमी तुमच्या मागे कॉरिडॉरमध्ये का फिरत असतो?” हे ऐकल्यावर, तिथून त्वरित निघून जाणेच योग्य आहे, असे त्या नर्सला वाटले.
ही गोष्ट खरी आहे का?
या गोष्टीला पुष्टी देणारा कोणताही अधिकृत पुरावा नाही; ती एका नर्सने केलेल्या दाव्यांवर आधारित आहे. असे असले तरी, ही गोष्ट लोकांना घाबरवून सोडत आहे.
(डिस्क्लेमर: ही बातमी व्हायरल झालेल्या वृत्तांतांवर आणि लोकांच्या प्रतिक्रियांवर आधारित आहे. या कथेत केलेल्या कोणत्याही दाव्याच्या सत्यतेची ‘टीव्ही ९ मराठी’ दावा करत नाही.)
