AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Emraan Hashmi : मी 20 वर्षांपासून भोगतोय.. ‘सीरियल किसर’ इमेजबद्दल इमरान हाश्मी स्पष्टच बोलला, या व्यक्तीवर फोडलं खापर

इमरान हाश्मीच्या चित्रपटांमधील बोल्ड किसींगची चर्चा त्यावेळी बरीच व्हायची. इतकी वर्ष झाली तरी आजही त्याची सीरियल किसर म्हणूनच ओळख आहे. या इमेजवर इमरानने पहिल्यांदा आपले मत मांडले आहे. त्याने थेट दिग्दर्शकाला जबाबदार ठरवले आहे. इमरान म्हणाला..

Emraan Hashmi : मी 20 वर्षांपासून भोगतोय.. 'सीरियल किसर' इमेजबद्दल इमरान हाश्मी स्पष्टच बोलला, या व्यक्तीवर फोडलं खापर
Emraan Hashmi Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 12, 2026 | 2:03 PM
Share

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी हा एकेकाळी सिरीयल किसर म्हणून ओळखला जायचा. त्याच्या चित्रपटांमधील बोल्ड किसींगची चर्चा त्यावेळी बरीच व्हायची. इतकी वर्ष झाली तरी आजही त्याची सीरियल किसर म्हणूनच ओळख आहे. या इमेजवर इमरानने पहिल्यांदा आपले मत मांडले आहे. त्याने थेट दिग्दर्शकाला जबाबदार ठरवले आहे. इमरान म्हणाला..

पुण्यात बुधवारी 11, नोव्हेंबर रोजी ‘गनमास्टर जी 9’ चा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी इमरान हाश्मी, जेनेलिया देशमुख, अपारशक्ती खुराना, अभिषेक सिंह, दिग्दर्शक आदित्य दत्त आणि निर्माते दीपक मुकुट उपस्थित होते. माध्यमांशी संवाद साधत असताना इमरानने करिअरच्या सुरूवातीच्या काळातील चित्रपटांची आठवण काढली. त्या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन असल्यामुळे टिव्हिवर ते चित्रपट लागले की पालक मुलांना झोपायला सांगायचे. असं इमरान गंमतीने म्हणाला.

यानंतर त्याने आदित्य दत्त यांच्याकडे बोट दाखवत, ‘ हे सगळं त्यांच्यामुळे झालं आहे. गेल्या 20 वर्षांपासून मी त्याचे परिणाम भोगतोय, ‘ अशा शब्दात मिश्किल टोला लगावला. इमरानच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली.

इमरान आणि आदित्य यांची जोडी यापूर्वी ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटात एकत्र आली होती. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात इमरानच्या बोल्ड अंदाजाची मोठी चर्चा झाली होती. आता जवळपास 21 वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे. या नव्या चित्रपटासाठी संगीतकार हिमेश रेशमिया देखील त्यांच्यासोबत आहेत.

‘गनमास्टर जी 9’ च्या चित्रीकरणाचा अनुभव सांगताना इमरानने प्रत्यक्ष ठिकाणी शूटिंग केल्याचं सांगितलं.हरिव्दार, डेहराडून आणि ऋषिकेश या ठिकाणी जवळपास 60 दिवस चित्रपटाचं चित्रीकरणं झालं. स्टुडिओ किंवा ग्रीन स्क्रिनऐवजी प्रत्यक्ष ठिकाणी शूटिंग करण्याचा अनुभव त्याला आवडला. असे त्याने सांगितले.

‘गनमास्टर जी 9’ हा चित्रपट 27 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे इमरान आणि आदित्य दत्त यांची ही नवी जोडी पडद्यावर काय कमाल करते याकडे चाहत्यांच लक्ष लागलं आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक
महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, राऊतांचा..
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, संजय राऊतांचा इशारा; भोजपुरी गाण्यांवरून सरकारला सवाल