Viral Video: मगरींनी घेरलं, पण ‘आकाशाच्या राजा’ने वाचवले! सिंहाच्या बछड्याचा खतरनाक व्हिडीओ

कधीकधी सिंह देखील इतर प्राण्यांच्या जाळ्यात अडकतात, त्यानंतर जीव वाचवणे कठीण होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये असेच काहीतरी दिसते. एका सिंहाचा बछडा मगरींच्या मध्ये अडकला होता, त्यानंतर त्याचा जीव धोक्यात आला होता. पण एका गरुडाने अगदी वेळेवर येऊन त्याला वाचवले.

Viral Video: मगरींनी घेरलं, पण ‘आकाशाच्या राजा’ने वाचवले! सिंहाच्या बछड्याचा खतरनाक व्हिडीओ
baby-lion
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 31, 2025 | 4:00 PM

असे म्हटले जाते की सिंहासमोर कोणीही टिकू शकत नाही. मग तो कितीही मोठा शिकारी असला तरी, सिंहापेक्षा मोठा शिकारी कोणीही असू शकत नाही. सिंहाला असेच जंगलाचा राजा म्हटले जात नाही, तर त्याने आपल्या शक्तीने हे सिद्ध केले आहे की जंगलात त्याच्यापेक्षा बलवान कोणीही नाही. पण कधीकधी तो देखील इतर प्राण्यांच्या जाळ्यात अडकतो आणि मग त्याचा जीव धोक्यात येतो. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याने लोकांना आश्चर्यचकित केले आहे.

काय आहे व्हिडीओ?

खरंतर, एक सिंहाचा बछडा पाण्यात अडकला होता. तो तेथूर बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होता. किनाऱ्यावर एक सिंह उभा होता आणि तो इच्छा असूनही बछड्याची मदत करू शकत नव्हता. कारण पाण्यात मगरींचा समूह होता, जो हळूहळू त्या छोट्या सिंहाच्या दिशेने सरकत होता. याचवेळी तिथे एका अशा प्राण्याची एन्ट्री होते, ज्याला ‘आकाशाचा राजा’ म्हटले जाते आणि तो सिंहाच्या पिल्लाचा जीव वाचवतो.

वाचा: ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे कार वाहून गेली, हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल

हा प्राणी आहे गरुड. तो उडत येतो आणि सिंहाच्या पिल्लाला आपल्या पंज्याने उचलून किनाऱ्यावर ठेवतो आणि उडून जातो. यामुळे सिंहाच्या पिल्लाचा जीव वाचतो, नाहीतर तो मगरींच्या जाळ्यात अडकला असता तर त्याचा मृत्यू निश्चित होता.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर @Digital_khan01 या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘जेव्हा संकट गडद होते, तेव्हा राजांनाही आधाराची गरज भासते, आकाशाच्या राजाने जमिनीच्या सिंहाला वाचवून हे सिद्ध केले.’

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

अवघ्या 12 सेकंदांच्या या व्हिडीओला आतापर्यंत 3 लाख 42 हजारांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे, तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाइक केले आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, ‘संकटात माणूस नाही, फक्त संकटमोचकच आधार बनतो. मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा खरा महान आहे’, तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे, ‘जेव्हा संकट गडद होते, तेव्हा सर्वात मोठेही छोटे होतात आणि आधार आवश्यक होतो’. दरम्यान, काही युजर्स असेही आहेत, जे हा व्हिडिओ एआय जनरेटेड असल्याचे सांगत आहेत आणि म्हणत आहेत की मगर खतरनाक आहे, पण एआय त्याहूनही अधिक खतरनाक आहे.