तलावात हळद टाकून केला हळदीचा ट्रेंड, अचानक पाण्यातून साप बाहेर आला अन्… पाहा Video नेमकं काय झालं?

हा ट्रेंड व्हिडीओ करत असताना, या व्यक्तीसोबत अशी घटना घडली, जी पाहून कोणीही हैराण होऊ शकते. आता या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तलावात हळद टाकून केला हळदीचा ट्रेंड, अचानक पाण्यातून साप बाहेर आला अन्... पाहा Video नेमकं काय झालं?
Viral video
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 03, 2025 | 2:49 PM

सध्या सोशल मीडियावर हळद-ग्लासात टाकण्याचा ट्रेंड प्रचंड व्हायरल होत आहे. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड आणि राजकारणातील व्यक्तींपर्यंत सर्वजण हा ट्रेंड उत्साहाने फॉलो करत आहेत. मात्र, या ट्रेंडच्या नादात एका तरुणाने साऱ्या मर्यादा ओलांडल्या आणि तो थेट तालावात पोहोचला. तिथे त्याच्यासोबत अशी घटना घडली की काळजाता ठोका चुकला. या ट्रेंडदरम्यान घडलेला हा प्रसंग पाहून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकू शकते. आता या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पाहणाऱ्यांना देखील घाम फुटला आहे आहे.

हल्दी ट्रेंडचा सर्वात धोकादायक व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण हळद-ग्लास ट्रेंड करण्यासाठी हिरव्या शेवाळाने भरलेल्या तलावात उभा आहे. तो प्रथम तलावात एक चमचा हळद टाकतो आणि काहीतरी चमत्कार होण्याची वाट पाहतो. पण क्षणार्धात त्याच्यासमोर असे काही घडते की, त्याचा थरकाप उडतो. हळद टाकताच तलावातून फणा काढत एक साप बाहेर येतो आणि त्या तरुणावर हल्ला करतो. हे पाहून तरुणाचे डोळे विस्फारतात आणि तो घाबरून तलावातून पळ काढतो. खरे तर, जिथे हळद पडली, तिथूनच हा साप बाहेर आला आणि घाईगडबडीत हा तरुण आपली पळू लागतो.

वाचा: नाग मेल्यावर नागीण 24 तास मृतदेहाजवळ बसून राहिली अन्…; आश्चर्यचकीत करणारी घटना

लोकांनी उडवली चेष्टा

या व्हिडिओवर लोकांच्या मजेदार आणि धक्कादायक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले, “लो बेटा, रील बनली!” दुसऱ्या युजरने लिहिले, “आता हा घरी हळद पाहूनही घाबरेल.” तिसऱ्या युजरने म्हटले, “हळद-ग्लास ट्रेंडचा हा सर्वात धोकादायक व्हिडीओ आहे.” चौथा युजर म्हणतो, “बच गया बेटा, नाहीतर सापाने नवा ट्रेंड बनवला असता.” काही लोकांचे म्हणणे आहे की, पाण्याखाली कोणीतरी बसले असावे, ज्याच्या हातात हा बनावट साप होता. या व्हिडीओचे खरे-खोटेपण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या व्हिडीओला 46 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले असून, अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये धक्कादायक इमोजी शेअर केले आहेत.