VIRAL VIDEO | लग्नाच्या वाढदिवशी नवऱ्याकडून एक किलो सोन्याचा हार भेट? व्हायरल व्हिडीओमागील सत्य

| Updated on: May 23, 2021 | 3:38 PM

हा व्हिडीओ आहे कल्याणमधील कोनगावचे रहिवासी बाळू कोळी यांचा. कोळी यांच्या पत्नीच्या गळ्यात दिसणारा भरजरी हार पाहून सगळेच अवाक झाले (Viral Video 1kg Gold Necklace)

VIRAL VIDEO | लग्नाच्या वाढदिवशी नवऱ्याकडून एक किलो सोन्याचा हार भेट? व्हायरल व्हिडीओमागील सत्य
महिलेच्या गळ्यातील लांबलचक हाराचा व्हिडीओ व्हायरल
Follow us on

मुंबई : गुडघ्यापर्यंत लांब सोनेरी हार घातलेल्या महिलेसह तिचा नवरा गाणं गातानाचा व्हिडीओ तुम्ही नक्कीच सोशल मीडियावर पाहिला असेल. हा हार सोन्याचा असून एक किलो वजनाचा आहे, असा दावा अनेक व्हायरल मेसेजमध्ये केला जात आहे. मात्र हा दावा कितपत खरा आहे, सोन्याचे दर प्रतितोळा 50 हजारांच्या घरात पोहोचले असताना खरंच एक किलो सोन्याचा हार घालून महिला मिरवत आहे का, असे अनेक प्रश्न नेटिझन्सना पडले आहेत. या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न ‘टीव्ही9 मराठी’ने केला आहे. (Viral Video Lady wearing Said 1kg Gold Necklace is Fake)

काय आहे व्हिडीओ?

फक्त फेसबुकच नाही, तर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लाल साडी नेसलेली महिला गुडघ्यापर्यंत लांब सोनेरी हार घातलेली दिसत आहे. तिच्यासोबत नवरा ‘प्यार हमारा अमर रहेगा, याद करेगा जमाना’ हे ‘मुद्दत’ सिनेमातील गाजलेलं गाणं गात आहे. नवऱ्याच्या गळ्यातही सोन्याची चेन आहे. त्यांच्यासमोर टेबलवर केक कापलेला दिसत आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दोघं सेलिब्रेशन करत असल्याचं व्हिडीओवरुन वाटतं.

पोलिसांचा बाळू कोळींना फोन

हा व्हिडीओ आहे कल्याणमधील कोनगावचे रहिवासी बाळू कोळी यांचा. कोळी यांच्या पत्नीच्या गळ्यात दिसणारा भरजरी हार पाहून सगळेच अवाक झाले आहेत. विशेष म्हणजे पोलीसही चक्रावले असून त्यांनी कोळी यांना भेटीसाठी पोलीस स्टेशनला बोलावलं. चोऱ्यांचं प्रमाण वाढल्यामुळे काळजी घ्या, सोन्याच्या दागिन्यांचं सोशल मीडियावर प्रदर्शन करु नका, ती घरात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवा, असा सल्ला पोलिसांना द्यायचा होता. मात्र बाळू कोळी यांचं उत्तर ऐकून पोलीसच गपगार झाले.

तो हार नकली

तो हार सोन्याचा नसून खोटा आहे, असं खुद्द बाळू कोळी यांनी सांगितल्याचं वृत्त ‘मुंबई मिरर’ने दिलं आहे. “तो हार आपण अनेक वर्षांपूर्वी घेतला होता. त्याची किंमत 38 हजार रुपये आहे. बायकोने तो आमच्या अॅनिव्हर्सरीला घातला होता” असं कोळींनी सांगितलं. पोलिसांनी त्या हाराची कल्याणमधील एका ज्वेलरकडून तपासणी करुन घेतली. तो हार सोन्याचा नसल्याची ज्वेलरनेही पुष्टी दिली. (Viral Video Lady wearing Said 1kg Gold Necklace is Fake)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO: अवघ्या 900 ग्रॅम वजनाचं बाळ, झोपवण्यासाठी डॉक्टरांनीच गायली अंगाई

Puzzle Photo: या फोटोत दडलेत अनेक प्राणी, पण उंट आहे कुठे?; हुशार असाल तर शोधून दाखवाच!

(Viral Video Lady wearing Said 1kg Gold Necklace is Fake)