VIDEO: अवघ्या 900 ग्रॅम वजनाचं बाळ, झोपवण्यासाठी डॉक्टरांनीच गायली अंगाई

सुरुवातीचे काही दिवस या बाळाची प्रकृती नाजूक होती. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर आता बाळाची प्रकृती व्यवस्थित झाली आहे. | Doctor new born child

VIDEO: अवघ्या 900 ग्रॅम वजनाचं बाळ, झोपवण्यासाठी डॉक्टरांनीच गायली अंगाई


धुळे: गेल्या वर्षभरात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी समाजासाठी उपसलेल्या कष्टांना तोडच नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर या सगळ्यांवरील भार आणखीनच वाढला असला तरी हे सर्वजण आपले कर्तव्य पार पाडत आहेत. सध्या सोशल मीडियावर धुळ्यातील एका डॉक्टरांचा (Doctor) व्हीडिओ व्हायरल होत आहे. (Doctor in Dhule Maharashtra hospital sing a song for new born child)

धुळ्याच्या निओनॅटल इंटेसिव्ह केअर युनिटमधील ( NICU) डॉ. अभिनय दरावडे यांनी फेसबुकवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यांच्या रुग्णालयात नुकतंच एक बाळ जन्माला आलं आहे. या बाळाचं वजन अवघं 900 ग्रॅम इतकं आहे. वजन कमी असल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस या बाळाची प्रकृती नाजूक होती. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर आता बाळाची प्रकृती व्यवस्थित झाली आहे.

काही दिवसांपूर्वी हे बाळ रात्रीच्यावेळी जोरजोरात रडू लागलं. काही केल्या बाळ शांत व्हायला तयार नव्हते. तेव्हा डॉ. अभियन दरावडे यांनी गाण गायला सुरुवात केली. ‘इस मोड से जाते है… कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम रस्ते’ या गाण्याच्या ओळी म्हटल्यानंतर बाळ रडायचं थांबलं. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या:

प्रत्येक डॉक्टर देव नसतो… वडिलांच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार; अभिनेत्री संभावना सेठ लालबूंद

बाळ पाण्याच्या बादलीत पडून बेशुद्ध; खासगी रुग्णालयात उपचारास नकार, सरकारी डॉक्टरांचा चमत्कार

पंजाबच्या डॉक्टरांचा चमत्कार, पोलिसाचा कापलेला हात साडेसात तासात जोडला

(Doctor in Dhule Maharashtra hospital sing a song for new born child)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI