पंजाबच्या डॉक्टरांचा चमत्कार, पोलिसाचा कापलेला हात साडेसात तासात जोडला

पंजाबच्या पतियाळा जिल्ह्यात रविवारी (12 एप्रिल) सकाळी निहंग शिखांच्या जमावाने पोलिसांवर तलवारीने हल्ला केला (Nihangs attack on police patiala).

पंजाबच्या डॉक्टरांचा चमत्कार, पोलिसाचा कापलेला हात साडेसात तासात जोडला

चंदीगड : पंजाबच्या पतियाळा जिल्ह्यात रविवारी (12 एप्रिल) सकाळी निहंग शिखांच्या जमावाने पोलिसांवर तलवारीने हल्ला केला (Nihangs attack on police patiala). या हल्ल्यात एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्याचा हात कापला गेला. या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. यानंतर पोलीस अधिकाऱ्याला तातडीने पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी साडे सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर पोलीस अधिकारी हरजीत सिंह यांचा हात जोडला, अशी माहिती स्वत: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी (Nihangs attack on police patiala) दिली.

“मला खूप आनंद होत आहे की सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरजीत सिंह यांच्यावर पीजीआयमध्ये साडे सात तासांची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. मी डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे आभार व्यक्त करतो. त्यासोबत प्रार्थना करतो की हरजीत सिंह लवकर ठीक होऊ दे”, असं ट्वीट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केले.

नेमकं प्रकरण काय?

निहंग शीख एका कारमधून आले होते. त्यांना भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी जायचं होतं. भाजी मार्केटजवळील नाक्यावर पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते. निहंग शिख नाक्यावर पोहोचल्यावर त्यांच्याकडून पोलिसांनी कर्फ्यू पास मागितला. यावरुन पोलीस आणि त्यांच्यात वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. निहंग शीखांनी पोलिसांवर हल्ला केला. यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरजीत सिंग यांचा तर हातच कापला गेला.

पोलिसांवर हल्ला केल्यानंतर आरोपींनी बॅरिकेट्स तोडत धूम ठोकली. या हल्ल्यात पोलीस कर्माचाऱ्यांसोबतच भाजी मार्केट बोर्डाचे अधिकारीदेखील जखमी झाले. तर एका निहंगी शीखाला गोळी लागल्यामुळे तो जखमी झाला आहे. पतियाळाच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या प्रकरणानंतर फरार झालेल्या सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पोलीस याप्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

Published On - 4:02 pm, Mon, 13 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI