Puzzle Photo: या फोटोत दडलेत अनेक प्राणी, पण उंट आहे कुठे?; हुशार असाल तर शोधून दाखवाच!

सोशल मीडियात अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली जातात. त्यात अशा पझल फोटोंचाही समावेश असतो. ज्या छायाचित्रांचा लोक आनंद घेतात, यातूनच त्यांना आश्चर्याचा धक्काही बसतो. (Many animals hidden in this photo, but where is the camel; Find out if you're smart!)

Puzzle Photo: या फोटोत दडलेत अनेक प्राणी, पण उंट आहे कुठे?; हुशार असाल तर शोधून दाखवाच!
या फोटोत दडलेत अनेक प्राणी, पण उंट आहे कुठे?

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे घरीच बसला आहात ना. मग रिकाम्या वेळेत नेमके काय काय करायचे, हाही प्रश्न सतावत असेल. टीव्ही बघायचं म्हटलं तरी तो किती वेळ बघायचा? वाचन करायचे तरी किती वेळ पुस्तक डोके घालायचे? एक ना अनेक प्रश्न. बरे मग तुमच्यासाठीच हा एक पझल फोटो तुमची नक्कीच करमणूकही करेल आणि बुद्धीला चालना द्यायलाही भाग पाडेल. सोशल मीडियात अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली जातात. त्यात अशा पझल फोटोंचाही समावेश असतो. ज्या छायाचित्रांचा लोक आनंद घेतात, यातूनच त्यांना आश्चर्याचा धक्काही बसतो. (Many animals hidden in this photo, but where is the camel; Find out if you’re smart!)

सोशल मीडियात फोटो व्हायरल

बरीच चित्रे आपल्याला कोड्यात पाडतात. काही चित्रे दिसायला सामान्य स्वरुपाचीच असतात, परंतु ती लोकांना भ्रमित करतात. इथे आम्ही तुमच्यासमोर सादर करीत असेलेले छायाचित्रही तुम्हाला अशाच प्रकारे कोड्यात टाकेल. तुम्हाला बरेच प्रश्न पडू लागतील. मग आपसुकच तुम्ही या चित्राची तुमच्या मित्रमंडळींसोबतही चर्चा करायला सुरुवात कराल. कारण तुम्हाला या चित्रासोबत पडलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडत नसेल. हे चित्र सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले, यामागील प्रमुख कारण हेच आहे. या चित्रात तुम्हाला बरेच प्राणी दिसताहेत, परंतु लोकांना उंट शोधण्यास सांगितले जात आहे. बहुतेक लोक उंट शोधण्यात अपयशी ठरले आहेत. बराच वेळ चित्र डोळ्यासमोर ठेवूनही त्यांना उंटाचा काही थांगपत्ता लागलेला नाही.

पझलमध्ये अनेक प्राण्यांची चित्रे

या पझल फोटोमध्ये एका व्यक्तीचा चेहरा बनविला गेला आहे. ज्यावर बऱ्याच प्राण्यांची चित्रे रेखाटली आहेत. सर्व चित्रे एकत्र करून एका व्यक्तीचा चेहरा बनवण्याची अनोखी किमया चित्रकाराने करून दाखवली आहे. चित्रात काही प्राणी आपल्याला सहज दिसताहेत अर्थात ते प्राणी कोणते आहेत, हे आपल्याला चटकन ओळखता येतेय. मात्र काही प्राण्यांचा शोध घेण्यासाठी आपल्या मेंदूला बराच ताण द्यावा लागेल. या चित्रात उंट कोठे आहे, असा प्रश्न सोशल मीडियात विचारला गेला आहे. त्यावर अनेक लोकांनी उंट शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही मोजक्या लोकांना त्यात यश मिळालेही, तर काहींना अजूनही उंटाचा शोध लागलेला नाही.

तुम्हाला उंट दिसतोय का?

हा फोटो भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हे चित्र शेअर करताना त्यांनीही कॅप्शनमधून एक प्रश्न विचारला आहे की, ‘तुम्हाला उंट दिसला का?’ आता हे चित्र लोकांमध्ये एक गोंधळाची स्थिती निर्माण करीत आहे. सोशल मीडियातील युजर्स चित्रामध्ये उंटाचा शोध घेत आहेत. बातमी लिहिलीपर्यंत हे चित्र जवळपास दोन हजार लोकांनी लाईक केले आहे. तथापि, सुमारे 140 लोकांनी रीट्वीट केले आहे. (Many animals hidden in this photo, but where is the camel; Find out if you’re smart!)

‘मला रं गड्या भीती कशाची!’ 101 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात

PMSBY Scheme : 31 मेपूर्वी बँक तुमच्या खात्यातून 12 रुपये कापणार, ग्राहकांना 2 लाखांचा फायदा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI