‘मला रं गड्या भीती कशाची!’ 101 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात

वाशिम जिल्ह्यातील एका 101 वर्षाच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केलीय. या आजींना ना काही दिसतं ना ऐकायला येतं.

'मला रं गड्या भीती कशाची!' 101 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात
वाशिम जिल्ह्यातील 101 वर्षाच्या आजींची कोरोनावर मात

वाशिम : राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. कोरोनामुळे अनेकांचा जीव गेला. काहीजणांनी कोरोनाची भीती बाळगून आपला जीव गमावला. ‘काही नाही ओ… घाबरल्यामुळे जीव गेला’, असं आपण अनेकांकडून अनेकांच्या बाबतीत ऐकलं असेल. पण वाशिम जिल्ह्यातील एका 101 वर्षाच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केलीय. या आजींना ना काही दिसतं ना ऐकायला येतं. अशा स्थितीतही त्यांना कोरोनाची भीती नव्हती आणि म्हणूनच वय 101 वर्षे असतानाही त्यांनी कोरोनाला हरवलं आहे. (101-year-old grandmother defeated Corona)

डोळ्यांनी दिसत नसल्यामुळे आणि कानाने ऐकायला येत नसल्यामुळे या आजीबाईंनी ना कोरोनाच्या बातम्या पाहिल्या ना कोरोनाबाबत काही ऐकलं. त्यामुळे त्यांना कोरोनाची भीती अशी वाटलीच नाहीत. कोरोनाची भीतीच नसल्यामुळे त्यांनी वयाच्या 101 व्या वर्षीही कोरोनाला चारी मुंड्या चित केलंय! जयवंताबाई गंगाराम रंजवे असं या आजीबाईंचं नाव आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील भोकरखेडा गावच्या त्या रहिवासी आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आजीबाईंचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. कुटुंबियांनी त्यांना कवठा आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं. तिथे त्यांच्यावर डॉक्टरांनी योग्य उपचार केले आणि आजी ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या.

भीतीच नाही तर घाबरण्याचा प्रश्न कुठे!

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आजींचा सिटी स्कॅन करण्यात आला. तेव्हा त्यांचा HRCT स्कोर 12 असल्याचं लक्षात आलं. त्यानुसार डॉक्टरांनीही आजींवर उपचार सुरु केले. औषधोपचारांबरोबरच आजींची इच्छाशक्ती दांगडी होती. तसंच त्यांच्या मनात कोरोनाबाबत कसलीही भीती नव्हती. ज्या गोष्टीची भीतीच नाही तर घाबरण्याचाही प्रश्न नव्हता. त्यामुळे आजींना या वयातही कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासली नाही. कवठा आरोग्य केंद्रात योग्य औषधोपचार आणि इच्छाशक्तीच्या बळावर आजी अवघ्या 10 दिवसांत कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या.

Grandmother Corona Free

वाशिम जिल्ह्यातील 101 वर्षाच्या आजींची कोरोनावर मात

‘आत्मविश्वासाच्या बळावर आजींची कोरोनावर मात’

‘माझ्या आईला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. तसंच कानाने ऐकूही येत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांचा स्कोर 12 होता तर ऑक्सीजनची पातळी 87 एवढी खाली आली होती. मात्र, या महामारीविरोधात लढा देत त्यांनी कोरोनाला हरवले. आईच्या सोबतीला डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि कुटुंबाच्या मानसिक पाठबळावर तिने कोरोनावर यशस्वी मात केली’, अशी प्रतिक्रिया आजीबाईचा मुलगा सोपान रंजवे यांनी दिलीय. तर योग्य उपचार आणि आत्मविश्वासाच्या बळावर आजी कोरोनामुक्त झाल्या, असं मत कवठा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जगन्नाथ काकडे यांनी व्यक्त केलंय.

संबंधित बातम्या :

लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा, बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स मार्गदर्शन करणार

लक्ष्मणरेषा ओलांडू नये, अन्यथा काय होतं ते कोरोनाने दाखवलं : उद्धव ठाकरे

101-year-old grandmother defeated Corona

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI