
सापासोबत कोणीही पंगा घेऊ शकत नाही. कारण साप कधीही हल्ला करेल आणि आपला जीव धोक्यात येईल हे सांगतला येत नाही. सर्वच साप हे विषारी नसले तरीही काही असे साप आहेत जे चावल्यानंतर जीव वाचवणे कठीण होते. आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिले आहे की गारुडी सापाला पुंगीवर नाचवताना दिसतो. पण प्रत्यक्षात असे झाल्याचे आपण कधीही पाहिले नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुणाने सापासोबत डान्स केला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण जंगलाच्या मधोमध खुर्ची-टेबल ठेवून आरामात बसला आहे. त्याच्या शेजारीच साप आहे. हा साप कोब्रा असल्याचे दिसत आहे जो सर्वाधिक विषारी आहे. तो तरुण सापाला मोबाइल दाखवत असते. त्यानंतर तो आपल्या हातांने बीन तयार करतो आणि बीन वाजवल्यासारखे इशारे करू लागतो. हे पाहून सापही तशाच अंदाजात नाचू लागतो. जसे चित्रपटांमध्ये बीन वाजवल्यावर सापांना नाचताना दाखवलं जातं. कुत्री-मांजरी तर तुम्ही माणसांच्या गोष्टी ऐकताना आणि त्यांच्या इशाऱ्यावर काही काम करताना खूप वेळा पाहिलं असेल, पण कदाचित सापाला असे करताना कधीच पाहिले नसेल. हा व्हिडीओ धक्कादायक आहे.
वाचा: नाग आणि नागिण कसे ओळखावे? कोण असतं सर्वात जास्त विषारी? सत्य कळताच थरकाप उडेल
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sahabatalamreal या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाख 70 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर 5 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाइक केलं आहे. व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही येताना दिसत आहेत.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. साप माणसाचे कसे ऐकत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एका युजरने कमेंट करत विचारले की, ‘साप तुझं ऐकत कसा आहे?’, तर दुसऱ्याने मजेशीर अंदाजात लिहिलं आहे, ‘सापाने छान नाच केला आहे.’ तिसऱ्या एका युजरने लिहिले की आहे, ‘भाऊला सापांची भीती वाटत नाही का?’, तर एकाने विचारलं आहे, ‘तू सापाला असा नाचायला कसं शिकवलंस?’ सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.