Viral Video : फॅशनच्या नावावर काहीही, या व्यक्तीचा पोशाख पाहून राक्षसांची आठवण नक्की होईल

आजकाल अतिशय विचित्र कपडे घातलेली एक व्यक्ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्यक्तीचे कपडे पाहिल्यानंतर अनेकजण घाबरले आहेत. काही लोक त्याला 'राक्षसाची पोशाख (Devil's Clothing)' म्हटले आहे. लोकांनी या व्यक्तीच्या कपड्यांना 'नेक्स्ट लेव्हल कॉस्ट्यूम' (Next Level Costume) देखील म्हटले आहे.

Viral Video : फॅशनच्या नावावर काहीही, या व्यक्तीचा पोशाख पाहून राक्षसांची आठवण नक्की होईल
viral video of devils clothing
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 8:29 AM

मुंबई : तुम्ही फॅशन शो आणि फॅशन टीव्हीवर अनेक विचित्र कपडे घातलेल्या मॉडेल्स पाहिल्या असतील. अनेकवेळा अभिनेते-अभिनेत्रीही चित्रपट महोत्सवात विचित्र कपडे घालून येतात. यानंतर त्यांना ट्रोलिंगला बळी पडावे लागते.

आजकाल अतिशय विचित्र कपडे घातलेली एक व्यक्ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्यक्तीचे कपडे पाहिल्यानंतर अनेकजण घाबरले आहेत. काही लोक त्याला ‘राक्षसाची पोशाख (Devil’s Clothing)’ म्हटले आहे. लोकांनी या व्यक्तीच्या कपड्यांना ‘नेक्स्ट लेव्हल कॉस्ट्यूम’ (Next Level Costume) देखील म्हटले आहे.

पाहा हा व्हिडीओ –

पाहायला अत्यंत भितीदायक

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, त्या व्यक्तीने घातलेले कपडे चार पायाचे आहेत. नुसते पाय बघितले तर असं वाटेल की आपण उंट पाहातोय. याशिवाय, त्या व्यक्तीच्या पाठीवर त्याच कापडाचं कुबड देखील आहे. त्याचवेळी, त्या व्यक्तीने आपला चेहराही खूप भीतीदायक आणि विचित्र बनवला आहे.

या विचित्र पोशाखाचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर आर्ट डेलीडोज नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. येथे हा व्हिडीओ अतिशय वेगाने व्हायरल होतो आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 1.1 दशलक्ष लोकांनी पाहिला आहे, तर व्हिडीओला 56 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

संबंधित बातम्या :

Viral Video | मंदिरात चोरी करण्यापूर्वी चोराने घेतला देवाचा आशीर्वाद, व्हिडीओ व्हायरल

Viral Video | लोभी चिंपांझीचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले हा तर मानवांसाठी एक खास संदेश