AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: या भावाची बाईक बघितल्यानंतर इंजिनिअरही डोकं खाजवतील, पाहा विनापेट्रोल चालणारी जुगाडी बाईक!

सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत, या महागाईमुळे पेट्रोलपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही लोक इलेक्ट्रिक बाइककडे वळू लागले आहेत. अशा परिस्थितीत देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने काय केलं तुम्हीच पाहा!

Video: या भावाची बाईक बघितल्यानंतर इंजिनिअरही डोकं खाजवतील, पाहा विनापेट्रोल चालणारी जुगाडी बाईक!
देसी जुगाड
| Edited By: VN | Updated on: Oct 30, 2021 | 6:29 PM
Share

या जगात एकापेक्षा एक ढासू जुगाडी आहेत! त्याचे जुगाड पाहून अनेक वेळा चांगले चांगले इंजिनिअरही डोकं खाजवतात. हे असे लोक आहेत जे भंगारातूनही फरारी तयार करतात. अशाच एका जुगाडचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही क्षणभर आश्चर्य वाटेल. हे आपल्याला कसं नाही सुचलं. (Viral video of Desi Jugaad man who made turned the bike into a cycle Netizens were shocked to see it )

सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत, या महागाईमुळे पेट्रोलपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही लोक इलेक्ट्रिक बाइककडे वळू लागले आहेत. अशा परिस्थितीत देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने बाईकचे सायकलमध्ये रूपांतर केले आहे, ज्याचा व्हिडिओ इंटरनेट जगतात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने जुगाडच्या माध्यमातून आपली मोटारसायकल सायकलमध्ये बदलल्याचे पाहायला मिळत आहे. या भावाचं डोकं बघून इंजिनिअरही आपल्या कर्तबगारीवर संशय घेतील. कारण त्या माणसाने बाईकचा वरचा भाग काढून त्याच्या सायकलला बसवला आहे. एवढेच नाही तर त्याने ही सायकल-बाईक रस्त्यावर चालवण्यास सुरुवातही केली आहे.

हा व्हिडिओ पाहा

या जुगाडला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर अनेकांनी हा देसी जुगाडचा चमत्कार असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘खरंच! या जुगाडाने माझं डोकं फिरवलं आहे.’ दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘हा विचित्र जुगाड पाहून आईन्स्टाईन आणि न्यूटन क्षणभर स्वर्गातून परत येतील.

हेही पाहा:

Fact Check : पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलल्यास आगीचा भडका उडतो?, जाणून घ्या व्हायरल व्हिडीओंमागील सत्य!

Video: मॅनहोलवर फटाके फोडताना गटारच पेटलं, आगीच्या भडक्यात पोरं भाजली, पाहा धक्कादायक व्हिडीओ

 

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत