AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral: “छोटा बच्चा जानके हमको न आँख दिखाना रे”, छोटुसा पक्षी आणि एवढा मोट्टा हत्ती! वायरल झालेली स्टोरी

माणसाला सांगतो हे आपल्याला माहित आहे पण हेच प्राण्यांना कोण समजावत असेल? प्राण्यांना कसं कळत असेल कुणाशी कसं वागायचं? असाच एकदा एक छोटुसा हत्ती एका नदीवर पाणी पित असतो. तिथे एक पक्षी येतो.

Viral: छोटा बच्चा जानके हमको न आँख दिखाना रे, छोटुसा पक्षी आणि एवढा मोट्टा हत्ती! वायरल झालेली स्टोरी
वायरल झालेली स्टोरीImage Credit source: facebook
| Updated on: May 27, 2022 | 5:17 PM
Share

कुणी जर आपल्याशी चांगलं वागलं तर आपण चांगलं वागायचं आणि कुणी जर वाईट वागलं तर त्याला आहे तिथे आहे तसं उत्तर द्यायचं हे आपल्याला आधीपासूनच सांगितलं जातं. ही गोष्ट माणूस (Human) माणसाला सांगतो हे आपल्याला माहित आहे पण हेच प्राण्यांना (Animals) कोण समजावत असेल?  प्राण्यांना कसं कळत असेल कुणाशी कसं वागायचं? असाच एकदा एक छोटुसा हत्ती (Elephant) एका नदीवर पाणी पित असतो. तिथे एक पक्षी येतो. हत्ती छोटा असला तरी पक्षी तर हत्तीसमोर किती छोटा, हत्ती त्या पक्षाच्या खोड्या काढायला लागतो. हत्तीला वाटतं काय हा एवढुसा पक्षी काय करेल करून करून. हत्ती खोड्या काढतोय म्हटल्यावर पक्षी कसला शांत बसतोय. पक्षी सुद्धा हत्तीला चांगलाच नाचवतो. एवढासा जीव त्या पक्षाचा पण हत्ती चांगलाच त्याच्या तालावर नाचतो. ही जुगलबंदी बघताना लोकं मात्र जाम खुश होतात. पाहा व्हिडिओ –

हत्तीला दिसतं कि पक्षी पाणी प्यायला आलाय…

व्हिडिओत दिसत आहे की, नदीच्या काठावर एक पक्षी पाणी पिण्यासाठी आलेला असतो. याचवेळी एक छोटा हत्ती पाण्याबरोबर मौजमजा करत असतो. हत्तीला दिसतं कि पक्षी पाणी प्यायला आलाय, तो त्या पक्षाची खोड काढतो,त्याच्याबरोबर मजा करायला लागतो. हत्ती आपल्या सोंडेत पाणी घेतो आणि पक्षावर मारायला सुरुवात करतो. नंतर पक्षी मात्र त्याला चांगलाच त्रास देतो. पक्षी कधी हत्तीच्या पाठीवर स्वार होतो तर कधी हत्तीच्या पायावर हल्ला करून लहान हत्तीला स्तब्ध करून सोडतो. हत्तीला काय करावं तेच कळत नाही. त्यानंतर तो पळून जाऊ लागतो.

आयपीएस अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करण्याबरोबरच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “एखाद्याला लहान समजून चिडवणे मूर्खपणाचे आहे. कारण एखादा छोटा पक्षीही हत्तीवर नाचू शकतो.” हा व्हिडिओ बघितला कि कळतं लहान मोठं असं काही नसतं. कुणी कुणावरही भारी पडू शकतं. “कोणालाही कधीही कमजोर समजू नये.”

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.