Garba Viral Video: अरे ही तर गोकुलधाम सोसायटी! “अय हालो…” करत स्टेशनवरच चालू झाले लोकं, कुठे काय करतील भरवसा नाही

| Updated on: May 27, 2022 | 11:20 AM

हा व्हिडिओ रतलाम रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील आहे. बुधवारी रात्री बांद्रा-हरिद्वार गाडी (रात्री १०.१५) २० मिनिटे आधी आली. स्टेशनवर ट्रेनचा थांबा १० मिनिटांचा आहे. एकूण ३० मिनिटे ही गाडी इथे थांबली. अशा परिस्थितीत ट्रेनमध्ये प्रवास करणारा एक ग्रुप प्लॅटफॉर्मवर आला

Garba Viral Video: अरे ही तर गोकुलधाम सोसायटी! अय हालो... करत स्टेशनवरच चालू झाले लोकं, कुठे काय करतील भरवसा नाही
"अय हालो..." करत स्टेशनवरच चालू झाले लोकं...
Follow us on

डान्सचे अनेक असे व्हिडीओ (Dance Video) आहेत जे कायमच वायरल होत राहतात. भारतात जवळ जवळ सगळेच सण हे नाचून सेलिब्रेट केले जातात. लोकं इथे लग्नात नाचतात, गणपतीत नाचतात, नवरात्रीत नाचतात, होळीला नाचतात, धूलिवंदनला नाचतात, मिरवणुकीत नाचतात सगळीकडेच नाचतात. प्रत्येक राज्याचा त्यांचा असा स्वतःचा डान्स आहे, स्वतःचं म्युझिक आहे. गरबा हा गुजराती लोकांचा फार जिव्हाळयाचा विषय. अगदी आपण तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये पण लोकांना उठ कि सूट गरबा करताना पाहिलंय. त्यावर तर कित्येक मिम्स पण बनवले गेलेत. असाच एक व्हिडीओ आहे ज्यात लोकं रेल्वे स्टेशनवर उडी-उडी जाय गाण्यावर गरबा (Garba On Railway Station) करतायत. रतलामच्या स्टेशनवर (Ratlam Jn) रेल्वे येऊन थांबली आणि रेल्वे निघायला जरा वेळ लागणार होता, लोकांना बोअर झालं आणि मग काय लोकं चक्क प्लॅटफॉर्मवरच नाचायला लागले. हा भारत देश आहे. इथे लोकं कधी कुठे आणि काय करतील याचा काही भरवसा नसतो.

मध्य प्रदेशातील रतलाम स्टेशनवरचा व्हिडीओ

मध्य प्रदेशातील रतलाम स्टेशनवरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झालाय. प्रवासी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर अगदी आनंदात नाचत होते. रेल्वे स्थानकावर रेल्वे येऊन थांबली पण रेल्वे निघायला वेळ लागणार होता मग अशा परिस्थितीत प्रवाशांना मोकळा वेळ मिळाला म्हणून गाण्यावर नाचायला सुरुवात केली आणि बघता बघता बरेच प्रवासी सहभागी होत गेले. कंटाळा घालवण्यासाठी प्लॅटफॉर्मवर चक्क गरबा करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- मजामा! हॅपी जर्नी . ही क्लिप २२ सेकंदांची असून, काहीच वेळात ६० हजारांहून अधिक व्ह्यूज आणि ४ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर या प्रवाशांचा उत्साह पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

हा व्हिडिओ रतलाम रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील आहे. बुधवारी रात्री बांद्रा-हरिद्वार गाडी (रात्री 10.15) 20 मिनिटे आधी आली. स्टेशनवर ट्रेनचा थांबा 10 मिनिटांचा आहे. एकूण 30 मिनिटे ही गाडी इथे थांबली. अशा परिस्थितीत ट्रेनमध्ये प्रवास करणारा एक ग्रुप प्लॅटफॉर्मवर आला आणि ओढनी उरी-उरी करावी… आणि बॉलिवूडच्या इतर हिट गाण्यांवर नाचायला सुरुवात केली. याचाच व्हिडीओ वायरल झाला.