Viral Video: कार्टं लई वाढाव! बोकडाची केली बैलगाडी अन् पडलं उलथून…

Viral Video: कार्टं लई वाढाव! बोकडाची केली बैलगाडी अन् पडलं उलथून...
बोकडाची केली बैलगाडी अन् पडलं उलथून...
Image Credit source: TV9 marathi

कधी हे आगाऊपणा करतील म्हणून पालकांना मुलांवर म्हणूनच लक्ष ठेवावं लागत असेल. रोज एकातरी लहान मुलाचा व्हिडीओ वायरल होतोच होतो. आज अशाच एका वाढीव मुलाचा व्हिडीओ वायरल झालाय. तुम्ही कधी बोकडांची बैलगाडी पाहिलीये का?

रचना भोंडवे

|

May 26, 2022 | 7:59 PM

पुणे: लहान पोरं कधी काय करतील ह्यांचा काही भरवसा नसतो. कधी काय डोकं लावतील आणि कशाचं काय होऊन बसेल. कधी हे आगाऊपणा करतील म्हणून पालकांना (Parents) मुलांवर म्हणूनच लक्ष ठेवावं लागत असेल. रोज एकातरी लहान मुलाचा व्हिडीओ वायरल (Viral Video) होतोच होतो. आज अशाच एका वाढीव मुलाचा व्हिडीओ वायरल झालाय. तुम्ही कधी बोकडांची बैलगाडी (Bull Cart) पाहिलीये का? आज बघायला मिळेल तुम्हाला. जो व्हिडीओ वायरल झालाय त्या मुलानं चक्क बोकडाला एकत्र करून गाडी बनवलीये. बैलांची गाडी पाहिली, चाकांची गाडी पाहिली पण बोकडांची गाडी म्हणजे याला वेगळ्या लेव्हलची हुशारी लागते. त्यात ही हुशारी एका लहान मुलाने दाखवलीये. त्याने सरळ दोन बोकडांना एकत्र केलं त्याला जोडून एक चाकाची गाडी लावली आणि तो त्या गाडीवर बसला आणि पुढे त्याचा प्लॅन कितपत सक्सेसफुल झाला ते तुम्हीच बघा…

वायरल झालेला व्हिडीओ हा पुण्यातला आहे. बैलगाडी समजून बोकडावर बसलेला हा चिमुरडा मोठ्या आत्मविश्वासाने त्यावर बसतो आणि पुढे जाऊन उलथून पडतो आणि रडायला लागतो. मोठ्यांनाच काय तर लहानांना सुद्धा बैलगाडीचा मोह आहे. हा व्हिडीओ बघून सगळ्याच वयात असणारी बैलगाडीची क्रेझ दिसून येते. या व्हिडिओला अनेकांनी पसंती दिलीये. सोशल मीडियावर प्रचंड वायरल झालेला हा व्हिडीओ, प्रेक्षक या चिमुरड्याचं खूप कौतुक करतायत.

असाच एका लहान मुलीचासुद्धा व्हिडीओ वायरल झालाय

आनंद हा मिळत नसतो तो शोधावा लागतो. कुठलीही गोष्ट असो, लहान मोठी, महाग स्वस्त, साधी, नवी, सेकंड हॅन्ड आपल्याला त्यात आनंद शोधता यायला हवा. अशा गोष्टी लहानपणापासून मुलांना शिकवल्या जातात. असं म्हणतात कि लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात. खुश (Happy) राहायचं हे सांगण्यापेक्षा ते दाखवून द्यायला हवं आणि लहानपणीच ते दाखवलं गेलं तर उत्तम! असाच एक व्हिडिओ वायरल होतोय ज्यात एक माणूस सेकंड हॅन्ड सायकल विकत घेऊन घरी येतोय. तो आल्या आल्या त्याची मुलगी ती मुलगी खूप खुश होते आणि आनंदात ती नाचते (Dancing), उड्या मारते. आधीपासून आपल्या भारतात एक परंपरा आहे ज्यात आपण नवीन वस्तू किंवा नवीन काहीही आणलं कि आधी त्याची पूजा करतो. आता हळूहळू हे सगळं नजरेस पडणं कमी झालंय खरं पण या वायरल व्हिडिओत (Viral Video) ते ही दिसतं. त्या नवीन सायकलला मस्त हार लावून त्याची छान पूजा केली जातीये. मुलगी आणि बाप दोघंही खूप सुखी आणि समाधानी दिसतायत. हा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें