AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandit Ji Rocks Dulha Shock : लग्नमंडपात वराला नव्हता धीर; मग पुजारी असं काही बोलले, की…

लग्नां(Wedding)चा हंगाम सुरू झाला आहे. सोशल मीडिया(Social Media)वर आपण लग्नाचे अनेक मजेशीर व्हिडिओ (Video) पाहत असतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल.

Pandit Ji Rocks Dulha Shock : लग्नमंडपात वराला नव्हता धीर; मग पुजारी असं काही बोलले, की...
वधू-वर
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jan 21, 2022 | 8:54 AM
Share

लग्नां(Wedding)चा हंगाम सुरू झाला आहे. सोशल मीडिया(Social Media)वर आपण लग्नाचे अनेक मजेशीर व्हिडिओ (Video) पाहत असतो. कधी कधी हे व्हिडिओ खूपच मजेशीर असतात. नेटकऱ्यांनाही मग असे व्हिडिओ पाहायला आवडतात. एखादा व्हिडिओ वेगळा किंवा मनोरंजनात्मक असला तर तो लगेच व्हायरल होतो. त्यातही लग्नाचे व्हिडिओ हे आवडीनं पाहिले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल.

लग्नातला व्हिडिओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओ खूप सुंदर आहे. व्हिडिओमध्ये वधू-वर मंडपात बसलेले दिसत आहे. तर दुसरीकडे पंडितजी मंत्रोच्चार करून दोघांचं लग्न लावत आहेत. या दरम्यान, वर वधूच्या खांद्यावर हात ठेवून बसलेला असतो. मग पंडितजी असं काही बोलतात, की तिथं बसलेले सर्व लोक मोठ्यानं हसतात.

पंडितजी सर्वांसमोर म्हणतात…

व्हिडिओमध्ये दिसत आहे, की वर आपल्या वधूच्या खांद्यावर हात ठेवून आरामात बसलेला आहे. वधू देखील वराच्या वागण्यावर काहीही हरकत घेत नाही आणि आरामात पंडितजींचं म्हणणे ऐकतं. दरम्यान, पंडितजी वधूच्या नावानं हाक मारतात, तेव्हाच त्यांना वराचा हात दिसतो. यानंतर पंडितजी वराला सर्वांसमोर म्हणतात, ‘हात वर करा’, पाहा व्हिडिओ…

…आणि लोक जोरजोरात हसायला लागतात

पंडितजींनी हे सांगताच वर लाजतो आणि लगेचच वधूच्या खांद्यावरून हात काढून घेतो. ही घटना इतकी मजेशीर आहे, की तिथं बसलेले सर्व लोक वराला पाहून जोरजोरात हसायला लागतात. त्याच वेळी, वधूदेखील लाजते. weddingbells2022_ नावाच्या यूझरनं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर लोक भरभरून कमेंट्स करत आहेत.

Video : स्वच्छ पाण्यात एवढे मोठे मासे पाहिलेत? पर्यटकांनी माशांसोबत केलं कयाकिंग

Viral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन

नेस्लेनं किटकॅट चॉकलेटवर लावला भगवान जगन्नाथाचा फोटो, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?