Viral Video | पहिल्यांदा चष्म्याने जग स्पष्टपणे पाहिले, चिमुकलीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुम्हालाही आनंदाश्रू येतील

| Updated on: Nov 14, 2021 | 2:58 PM

सोशल मीडियाच्या जगात लहान मुलांच्या गोंडस क्षणांचे व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. जे तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला आवडतात. मात्र, यातील काहींना पाहून आश्चर्यही वाटते की, एवढ्या लहान वयात हे मुलं असे कसे काय करत असतील. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ समोर आला आहे, तो पाहून तुम्हीही भावूक व्हाल. या व्हिडीओमध्ये दिसणार्‍या चिमुरडीचे डोळे खूपच कमकुवत आहेत.

Viral Video | पहिल्यांदा चष्म्याने जग स्पष्टपणे पाहिले, चिमुकलीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुम्हालाही आनंदाश्रू येतील
cute viral video
Follow us on

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात लहान मुलांच्या गोंडस क्षणांचे व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. जे तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला आवडतात. मात्र, यातील काहींना पाहून आश्चर्यही वाटते की, एवढ्या लहान वयात हे मुलं असे कसे काय करत असतील. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ समोर आला आहे, तो पाहून तुम्हीही भावूक व्हाल. या व्हिडीओमध्ये दिसणार्‍या चिमुरडीचे डोळे खूपच कमकुवत आहेत. मुलीने पहिल्यांदा चष्मा घातल्यानंतर तिला सर्वकाही स्पष्ट दिसू लागलं ज्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुमचा दिवस सार्थक होऊन जाईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी खेळण्यांसोबत खेळताना दिसत आहे. तिथे एक व्यक्ती देखील उपस्थित आहे, जे बहुधा तिचे वडील आहेत. यानंतर ही व्यक्ती मुलीला चष्मा घालतो. व्हिडीओवर लिहिलेल्या कॅप्शननुसार या मुलीला डोळ्याची समस्या होती. चष्म्यातून ती पहिल्यांदाच सर्व काही स्पष्टपणे पाहू शकत होती. व्हिडीओतील मुलीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. जेव्हा तिला पहिल्यांदा चष्म्यातून सर्वकाही स्पष्टपणे दिसते तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती चिमुरडी जोरजोरात हसते आणि पुन्हा पुन्हा चष्म्याने सर्वकाही बघते. हे दृश्य खरोखरच भावनिक आहे.

पाहा हा व्हिडीओ –

Good News Movement नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे. पोस्टनुसार, मुलीचे वय दोन वर्षे आहे. तिला हायपरोपिया (hyperopia) आहे. यामध्ये दूरच्या गोष्टी स्पष्ट दिसत असल्या तरी जवळच्या गोष्टी दिसणे अवघड आहे. जवळपासच्या गोष्टी अस्पष्ट दिसतात. या मुलीला ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. या कारणास्तव तिने जग कधीच स्पष्टपणे पाहिले नव्हते.

11 नोव्हेंबरला ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ 6 लाख 30 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. आतापर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. तर सुमारे 2 हजार लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शेकडो लोकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, ‘माझ्या 4 वर्षांच्या मुलाने पहिल्यांदा चष्मा लावल्यानंतर मला सांगितले की आई झाडांना पाने असतात. तेव्हा मी खूप भावूक झालो, कारण माझ्या मुलाने वर्षानुवर्षे सर्वकाही अस्पष्ट पाहिले होते.’ त्याच वेळी, आणखी एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘हा खरोखर हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ आहे. या मुलीचा आनंद पाहून डोळे पानावले.’

संबंधित बातम्या :

Video: बेडकासोबतचा चिमुरडीचा क्युट व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, प्राण्यासोबतचं हे नातं खरंच गोड आहे

Viral Video | सापाचं असं रुप तुम्ही कधीही पाहिलं नसेल, पाहा हा खास व्हायरल व्हिडीओ