Video: शेकडो फूट खोल दरीवर आतापर्यंत तुम्ही कधीही पाहिला नसेल एवढा भयानक स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी आवाक!

हा व्हिडीओ कुणाचंही काळीज त्याच्या तोंडापर्यंत आणू शकतो. कुणाच्याही हृदयाचा ठोका चुकवू शकतो. अनेकजण स्वत:ला त्या स्टंटमॅनच्या जागी ठेऊन विचार करतात आणि रोमांचित होतात.

Video: शेकडो फूट खोल दरीवर आतापर्यंत तुम्ही कधीही पाहिला नसेल एवढा भयानक स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी आवाक!
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन डोंगरांमध्ये लोखंडी तार बांधलेली आहे आणि एक माणूस त्या तारेवर सायकल चालवतो आहे

जगात असे बरेच लोक आहेत ज्यांना स्टंटबद्दल मोठी क्रेझ आहे, यातील काही स्टंट बघून आपल्याला भीती वाटते, काही स्टंट बघू अंगावर शहारे येतात, तर काही व्हिडीओ पाहताना आपल्याला हसू येते. असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही नक्कीच ओरडू शकता. (Viral video of man performed stunt mountains people were shocked after watching this)

हा व्हिडिओ इतका धोकादायक आहे, की बघणाऱ्याला धक्काच बसतो. व्हिडिओ पाहिल्यावर असे वाटते की हा कुठल्यातरी उत्सवाचा वा परंपरेचा भाग आहे, ज्यामध्ये टेकडीच्या मध्यभागी स्टंटमॅनकडून धोकादायक आणि घातक स्टंट केले जात आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन डोंगरांमध्ये लोखंडी तार बांधलेली आहे आणि एक माणूस त्या तारेवर सायकल चालवतो आहे, आणि या सायकलीला एक दोरी लटकवण्यात आली आहे, ज्यावर दरीत एक दुसरा माणूस तरंगत आहे, याच तारेवर दुसरी एक चाकाची सायकल आहे, जो स्टंटमॅन चालवतो आणि त्यालाही अडकवलेल्या दोरीला एकजण लटकत आहे. तितक्यात एकजण मोटारसायकल घेऊन या तारेवर येतो, त्याच्याही गाडीला दोरी आणि त्यावर स्टंटमॅन बसलेला आहे.

हे तिघेही दरीच्या बरोबर मध्ये जातात, आणि तिथे काही स्टंट करतात. मग बाईकवाला स्टंटमॅन बाईक फिरवून घेतो, आणि तारेवर जोरात गाडी चालवतो, हे करताना तो गाडीच्या सीटवर उभाही राहतो. हा व्हिडीओ कुणाचंही काळीज त्याच्या तोंडापर्यंत आणू शकतो. कुणाच्याही हृदयाचा ठोका चुकवू शकतो. अनेकजण स्वत:ला त्या स्टंटमॅनच्या जागी ठेऊन विचार करतात आणि रोमांचित होतात. हा व्हिडीओ जुना असला तरी आता खूप व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहा:

हा आश्चर्यकारक व्हिडिओ IPS रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओ लिहिण्याच्या वेळेपर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले, ‘ते त्यांच्या आयुष्याच्या प्रेमात नाहीत का?’ या व्हिडिओवर अनेकजण विविध प्रतिक्रिया देत आहेत.

हेही पाहा:

Video: तुम्हीच आहात, तुमच्या आयुष्याचे “फ्रंटमॅन”, स्क्विड गेम सीरिजचा व्हिडीओ वापरुन मुंबई पोलिसांचा अनोखा संदेश

Video: डिलीव्हरी बॉयचा भन्नाट डान्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, नेटकरी म्हणाले, हा तर मायकल जॅक्सन!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI