Video: डिलीव्हरी बॉयचा भन्नाट डान्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, नेटकरी म्हणाले, हा तर मायकल जॅक्सन!

एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्ही पार्सल घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयला डान्स करताना पाहू शकता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Video: डिलीव्हरी बॉयचा भन्नाट डान्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, नेटकरी म्हणाले, हा तर मायकल जॅक्सन!
डान्स करणारा डिलीव्हरी बॉय

जेव्हा तुम्ही घरी बसून काही ऑनलाईन ऑर्डर करता, तेव्हा कित्येक तासांनी डिलिव्हरी बॉय तुमचे पार्सल घेऊन दारावर येतो, त्याच्यामुळे डिलीव्हरी पर्सनच्या चेहऱ्यावर थकवा साफ दिसतो. पण जरा कल्पना करा की, तुमचे पार्सल डान्सिंग डिलिव्हरी बॉय घेऊन आला तर तुम्हाला कसे वाटेल? आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्ही पार्सल घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयला डान्स करताना पाहू शकता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Dancing delivery boy delivers parcel by showing his dancing style in front of cameras)

या व्हिडिओमध्ये एक डिलीव्हरी बॉय हातात पार्सल घेऊन जाताना दिसत आहे, पण तो दरवाजाजवळ येताच तो प्रोफेशनल डान्सरप्रमाणे नाचू लागला. एवढेच नाही तर तो वेगवेगळे स्टंटही करतो. काही वेळानंतर, त्याची नजर दरवाजाजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पडते, जे पाहून तो थांबत नाही, उलट अतिउत्साहित होतो आणि पूर्ण शरीर हलवत फ्रीस्टाईल नाचू लागतो. या डिलीव्हरी बॉयचा डान्स समोर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड होतो. असा परफेक्ट डान्स पाहून घराच्या मालकाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. काही दिवसातच हा व्हिडिओ व्हायरल झाला.

पाहा व्हिडीओ:

हा सीसीटीव्ही फुटेज डान्स व्हिडिओ एबीसी न्यूजच्या ट्विटर पेजवर शेअर करण्यात आला आहे. जरी हा व्हिडिओ खूप जुना असला तरी आता तो सोशल मीडियावर पाहिला जात आहे. व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे ‘डिलिव्हरी बॉय कॅमेरा बघूनही आपला डान्स चालू ठेवतो’. आतापर्यंत या व्हिडिओला 1 लाखाहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. या डान्सिंग डिलीव्हरी बॉयची अनोखी शैली लोकांना आवडत आहे. नेटकरी या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत, एकाने कमेंट केली की ‘असं दिसते की आज डिलीव्हरी बॉयला बोनस मिळाला असावा’. यावर दुसर्‍याने लिहिले ‘कदाचित या थंड प्रदेशात अंग गरम ठेवण्यासाठी हा डान्स करतो आहे.’

हेही वाचा:

Video: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, लहान मुलींचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल!

Video: जुते दो, पैसे लो म्हणत, मेव्हणीची दाजींकडे चक्क 21 लाखांची मागणी, पाहा लग्नातील भन्नाट किस्सा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI