Video : घासून पुसून केलं स्वच्छ, अजगराची आंघोळ पाहिलीत का ? व्हिडीओ पाहून उडेल थरकाप
Viral Video : एखाद्या मोठ्या, विशाल अजगराला कोणी पाळू शकतं का ? अगदी तसं केलंही तर त्याला कोणी एखाद्या लहान मुलासारखी अंघोल घालू शकेल का ? नाही... असं उत्तर देण्यापूर्वी एकदा ही बातमी वाचाच आणि व्हिडीओही जरूर पहा..

साप… नाव काढलं की निम्म्या लोकांची घाबरगुंडी उडते. बहुतांश लोकं सापांना घाबरातात, त्यांच्या जवळ जाण्याचीही अनेक लोकांना भीती वाटते. काही साप तर इतक खतरनाक असतात की त्यांना नुसतं पाहून देखील लोकांच्या अंगावर भीतीने काटाच येतो. पण देश-विदेशात काही लोक असेही असतात जे साप पाळतात. एवढंच नव्हे तर प्रसंगी त्यांची काळजी घेत त्यांना अंघोळ वगैरेही घालतात. हो, हे अगदी खरं आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि तो पाहून तुम्हालाही नक्कीच कापरं भरेल. या व्हिडिओमध्ये एक माणूस एका महाकाय अजगराला घासून पुसून, चक्क आंघोळ घालताना दिसत आहे. हे दृष्य पाहून तुमचाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाहीलहे नक्कीय
हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला असून सोशल मीडियावर अगदी धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक माणूस कापडाचा वापर करून अजगराला साबण लावताना दिसतो. त्या अजगराच्या लांब, जड आणि चमकदार शरीराकडे पाहून अंदाज लावता येतो की तो कित्येक फूट उंच आणि खूप मजबूत असले, परंतु आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो आंघोळ करताना पूर्णपणे शांत राहतो. त्या माणसावर तो हल्ला चढवत नाही की त्याला काही करतही नाही. कित्येक वेळेस तो माणूस त्याचं तोंड पकडतो, त्याला नीट साबणही लावतो, पण तो अजगर जराही त्रास देत नाही. हे दृश्य पाहणे जितके मनोरंजक आहे तितकेच ते रोमांचक आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणालाही भीती वाटणं स्वाभाविक आहे.
इथे पहा व्हिडीओ
View this post on Instagram
नेटीझन्सच्या भन्नाट कमेंट्स
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ phriie_putranaja28 नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 35 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 49 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे आणि विविध कमेंट्स केल्या आहेत.
“या भावाला भीती कशी वाटत नाही ? हाँ अजगर तर एका माणसाला सहज गिळू शकतो”, असं एकाने लिहीलं. तर ” हा अजगर इतका शांत कसा आहे ? पाल पाहूनसुद्धा मला कापरं भरतं”, अशी कमेंट दुसऱ्याने केली. “आता अजगरालाही स्पा ट्रीटमेंट मिळत आहे” ,अशी मजेशीर कमेंट आणखी एकाने केली.
