
साप आणि मुंगूसाचे वैर खूप जुने आहे. जंगलापासून ते शेतापर्यंत, मग गावात असो वा शहरातील रस्त्यांवरही जिथे हे दोन प्राणी समोरासमोर येतात, तेव्हा संघर्ष जवळपास निश्चितच मानला जातो. निसर्गाने दोघांना अशा नात्यात ठेवलं आहे ज्यात एक शिकारी आहे आणि दुसरा शिकार. यामुळेच दोघांमध्ये मित्रत्वाची जागा उरत नाही. मुंगूस आपल्या चपळाईने, वेगाने आणि शरीरातील आंशिक प्रतिकार क्षमतेमुळे सापाच्या वार आणि त्याच्या विषाचा चांगल्या पद्धतीने सामना करतो. दुसरीकडे साप कितीही विषारी असला तरी मुंगूसाचा प्रतिहल्ला त्याला अडचणीत टाकतो.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला नाग आणि मुंगूसाची टक्कर पाहून प्रेक्षकांची नजर हटतच नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की रस्त्याच्या कडेला नाग फणा काढून उभा आहे. तेवढ्यात मागून येणारा मुंगूस झटकन हल्ला करतो. पहिला वार नाग कसाबसा टाळतो, पण काही क्षणांतच दोघे समोरासमोर येतात. मुंगूसाच्या वेगवान हालचाली नागाला सतत बचावाच्या स्थितीत ठेवतात. दुसरीकडे सापही मागे हटणारा दिसत नाही आणि सतत प्रतिहल्ला करत राहतो.
थक्क करणारी लढाई समोर आली
काही सेकंदांच्या झटापटी नंतर नाग चांगलाच जखमी दिसतो, तरीही लढाई सुरू ठेवतो. हळूहळू मुंगूस त्याच्यावर चांगलाच हल्ला करतो आणि शेवटी दूर झुडुपांच्या दिशेने ओढत घेऊन जातो. व्हिडीओ येथेच संपतो, पण जे दृश्य दिसतात ते थ्रिलरसारखी अनुभूती देतात. अनेक प्रेक्षकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणाला तर हे साहसी वाटलं, कोणाला निसर्गाचा नियम. एका युजरने मजेत लिहिलं की, आपण सर्वांनी फूड चेन शिकलो आहोत म्हणून कॅमेरामनला दोष देण्याचा काही अर्थ नाही.
खरं तर मुंगूस स्वभावाने शिकारी असतो आणि साप त्याच्या आहारात समाविष्ट असतो. दोघे एकाच प्रकारच्या भागात राहतात आणि शिकाराच्या शोधात अनेकदा एकाच जागी पोहोचतात. अशा वेळी संधी मिळाली की भिडणार हे निश्चित असते. त्यांची स्पर्धा अनेक स्तरांवर दिसते. एक तर दोघांचं राहणीमान एकमेकांशी खूप मिळतं-जुळतं आहे. दुसरं म्हणजे आहाराच्या शोधातही ते समोरासमोर येत राहतात. तिसरं, मुंगूस सापाच्या तुलनेत खूप वेगवान असतो म्हणून तो सापाच्या हल्ल्यापासून वाचून त्वरित प्रतिहल्ला करतो.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
सापाच्या शरीरात विष सहन करण्याची आंशिक क्षमता असते म्हणून तो सापाशी थेट भिडू शकतो. जमिनीवरच्या लढाईत त्याची उडी आणि गती सतत सापाला दबावात ठेवते. यामुळेच अनेकदा नैसर्गिक वातावरणात मुंगूसाचे पारडं जड दिसतं. मात्र हे प्रत्येक वेळी आवश्यक नाही की निकाल एकसारखाच मिळेल कारण सापही कमी धोकादायक नसतो. सापाला संधी मिळाली तर तो मुंगूसासाठी गंभीर धोका बनू शकतो.