AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: गोंडस पांडांची काळजी घेणाऱ्या केअरटेकरच्या ‘या’ 55 सेकंदांच्या व्हिडिओने सोशल मिडियावर जिंकली अनेकांची मने…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला काही गोंडस पांडे आणि त्यांच्या केअरटेकरचा हा व्हिडिओ पाहाताच तुमच्याही चेहऱ्यावर गोड हसू उमटेल. तर हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया वापरकर्त्यांनी नोकरी सोडून पांडाची काळजी घेण्याची नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे तेही मोफत.

Viral Video: गोंडस पांडांची काळजी घेणाऱ्या केअरटेकरच्या 'या' 55 सेकंदांच्या व्हिडिओने सोशल मिडियावर जिंकली अनेकांची मने...
Panda
| Edited By: | Updated on: Sep 15, 2025 | 11:25 PM
Share

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात काही मनोरंजक असतात, तर काही भयानक असतात. अशातच पांडा आणि त्यांचा केअरटेकर यांचा एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पांडा हे असे प्राणी आहेत ज्यांची गणना जगातील सर्वात गोंडस प्राण्यांमध्ये केली जाते. अशातच हे गोड पांडे खूप संवेदनशील प्राणी असतात आणि त्यांची काळजी घेताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यांच्या आहारावर, आरोग्यावर आणि खेळावर लक्ष ठेवणे महत्वाचे असते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना सक्रिय आणि आनंदी ठेवण्यासाठी त्यांना खूप मानवी सहवासाची आवश्यकता असते. म्हणूनच जिथे पांडांना ठेवले जाते तिथे त्यांच्यासाठी एक विशेष कर्मचारी त्यांच्या देखभालीसाठी ठेवला जातो. आजकाल अशाच एका केअरटेकरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पांडांना लहान बाळांप्रमाणे त्यांचे लाड करताना दिसत आहे. या व्हिडिओने अनेक लोकांची मने जिंकली आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लहान मुलांप्रमाणे केअरटेकर पांडाची काळजी घेत आहे. तर यामध्ये केअरटेकर एका लहान टबमध्ये पाणी आणतो. त्यानंतर गेट बंद करून जमिनीवर बसताच, तीन-चार लहान पांडे त्याच्याकडे येतात आणि त्याच्या सोबत मस्ती करतात. मग केअरटेकर एका पांडाचा चेहरा आणि संपूर्ण शरीर टॉवेलने पुसतो. त्यानंतर तो दुसऱ्या पांडासोबतही असेच करतो. यादरम्यान सर्व पांडे त्याच्या अंगावर चढताना दिसतात. तर या गोड व्हिडिओने अनेकांची मने जिंकली आहे.

हा गोड व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @naturelife_ok या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘ही नोकरी कोणाला हवी आहे?’ फक्त 55 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 4 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने लिहिले की ‘ही जगातील सर्वात चांगली नोकरी आहे’, तर दुसऱ्याने लिहिले की, ‘पगार नकोय, मला दिवसभर पांडासोबत राहू दे’. त्याच वेळी, काही लोकांनी विनोदाने लिहिले की जर भारतात अशी नोकरी उपलब्ध असेल तर लाखो लोक रांगेत उभे राहतील. तसे तुम्ही ते पाहिले तर हे जगातील सर्वात न थकणारे आणि गोड काम असल्याचे सांगितले आहे.

Follow Us
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.