दरवाजा उघडताच चमकले डोळे, एकदम थरथराट, मृत्यूच्या जबड्यातून हा तरुण असा वाचला, हा Video पाहाच

Viral Video : जगातच काय तुमच्या आयुष्यात पण अचानक धक्कादायक गोष्टी घडल्या असतील. ज्याची अपेक्षा नव्हती असा धक्का तुम्हाला पण बसलाच असेल की. तुमच्यातील काही जण तर मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आले असतील. असाच काहीसा प्रकार या व्यक्तीसोबत घडला.

दरवाजा उघडताच चमकले डोळे, एकदम थरथराट, मृत्यूच्या जबड्यातून हा तरुण असा वाचला, हा Video पाहाच
व्हायरल व्हिडिओ
| Updated on: Feb 09, 2025 | 3:11 PM

Viral Video Today : आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अनपेक्षित गोष्टी घडतातच. त्या इतक्या धक्कादायक असतात की आपलं साधं सरळ आयुष्य पणाला लागतं. काहीचं आयुष्य उद्धवस्त होतं. तर काही आयुष्यातूनच उठतात. केव्हा काय घडेल हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार या तरुणासोबत घडला आहे. त्याने मृत्यू अगदी जवळून बघितला. त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. समयसूचकतेने त्याचे प्राण वाचले. नाहीतर त्याला पळायला सुद्धा वाट नव्हती.

सोशल मीडियावर रोज जगातील काही घडामोडी आपण रोज पाहतो. काही ना काही धक्कादायक समोर येतेच. काही व्हिडिओ पाहून हसू रोखता येत नाही. तर काही व्हिडिओ श्वास रोखायला मजबूर करतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक माणूस घराबाहेर येतो. दरवाजाच्या लॉक उघडतो आणि समोरचे दृश्य पाहताच त्याच्या काळजाचा ठोका चुकता.

त्याला पाहताच थरथराट

अंगावर काटे आणणारा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला. त्याला व्ह्युज आणि लाईक मिळाले आहेत. त्यावर अनेकांच्या कमेंटचा पाऊस पडला आहे. या व्हिडिओत संबंधित व्यक्ती रात्री घरी येते. तो दरवाजा उभा राहतो. किल्लीतील लॉक उघडतो. दरवाजा ढकलण्यापूर्वी कोणीतरी घरात असल्याचा त्याला अंदाज येतो. त्यामुळे तो धडकन दरवाजा उघडत नाही. तर हळूच दरवाजा लोटतो. तेव्हा दोन डोळे लुकलुकतात. तेव्हा तो जागीच खिळतो.

आतील दृश्य त्याचा थरकाप उडवते. ही व्यक्ती हळूच दरवाजा उघडते. तो एक इंचच दरवाजा लोटतो. हे दृश्य पाहताच कोणाला पण दरदरून घाम फुटल्याशिवाय राहणारच नाही. या व्यक्तीला जर अगोदर अंदाज आला नसता तर त्याचा मृत्यू अटळ होता. त्याच्या घरात थेट वाघाने प्रवेश केल्याचे दिसते. हा वाघ कुठून आणि कसा आला हे काही समोर आले नाही. पण दरवाजा उघडताच हा वाघ दरवाजाच्या फटीतून दिसला. हा वाघ झडप घालणारच तेव्हाच ही व्यक्ती दरवाजा लावून घेतो आणि पळ काढतो. @AMAZlNGNATURE या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.