देशातील या गावात माश्यांमुळे मुलांच्या लग्नाला ब्रेक!, कारण वाचून तुमचा पण विश्वास नाही बसणार
House Files : सध्या समाजात लग्नाळूंची लाट आली आहे. अनेक कारणांमुळे गावा-गावात विना लग्नाचे अनेक तरुण दिसतात. मुलींच्या अपेक्षा उंचावल्याचा पण परिणाम दिसून येतो. मुलींची संख्या कमी झाल्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. तर या गावात तरुणांना दुसरीच काळजी सतावत आहे.

लग्न हे कोणाच्याही आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना आहे. सध्या समाजात अविवाहित तरुणांची संख्या झपाट्याने वाढली आहे. सध्या समाजात लग्नाळूंची लाट आली आहे. अनेक कारणांमुळे गावा-गावात विना लग्नाचे अनेक तरुण दिसतात. मुलींच्या अपेक्षा उंचावल्याचा परिणाम दिसून येतो. मुलींची संख्या कमी झाल्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. तर या गावात तरुणांना दुसरीच काळजी सतावत आहे. या गावात माशांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. त्यामुळे अनेकांच्या लग्नात अडथळा येते आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, काय झालंय काय या गावात?
रुदवार गावचे तरुण वैतागलेत
उत्तर प्रदेशात उन्नाव जिल्हा आहे. माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार, नवाबगंज पंचायत समितीतंर्गत रुदवार नावाचे गाव आहे. येथे माशांची संख्या अचानक वाढल्याने गावकरी चिंतेत सापडले आहेत. त्यांची गावात दहशत पसरली आहे. या गावात जिकडं पाहावे तिकडे माशांचा अक्षरश: पाऊस पडला आहे. प्रत्येक घरात माशाच माशा आहेत. प्रत्येक सामानावर माशांच्या झुंडीच्या झुंडी बसल्या आहेत. पावसाळ्यात जसं माशांचं मोहोळ गावावर पडतं. गावकरी जणू माशांनीच झाकले जातात, अशी विचित्र स्थिती आहे.




ना जेवणाचा आनंद ना आरामदायक झोप
येथील नागरिकांचे जीवन या माशांनी नरकासमान केले आहे. या गावातील नागरिकांना ना जेवणाचा आनंद घेता येत ना त्यांची झोप होत. माशा अवतीभोवती घोंघावत असतात. त्यामुळे या गावात मुलगी द्यायला कोणताही पिता तयार होत नाहीये. या गावातील तरुणांशी लग्न करण्यास तरुणी तयार होत नाहीत. तर दुसरीकडे नातेवाईक सुद्धा या गावात येण्यास कचरतात. गावकऱ्यांची चोहोबाजूंनी या माश्यांनी दमकोंडी केली आहे.
माशांचा महापूर कशामुळे?
माशांचा हा महापूर कशामुळे आला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर यामागे येथे वाढलेला कुक्कुटपालन व्यवसाय आहे. पोल्ट्री फार्मचा व्यवसाय इथे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामाध्यमातून मोठे आर्थिक समीकरण, उलाढाल होते. अनेक पट नफा मिळतो. त्यामुळे अनेक पोल्ट्री फार्म उघडले आहेत. या पोल्ट्री फॉर्ममध्ये अनेक कोंबड्या मरतात. त्यांना न पुरता तसेच शेतात फेकण्यात येते. तर येथील घाण सुद्धा उघड्यावर टाकण्यात येते. त्यामुळे या भागात सर्वत्र दुर्गंध तर आहेच. पण माशांची संख्या पण भरमसाठ वाढली आहे. पूर्वी या सर्व परिसरात फवारणी करण्यात येत होती. स्वच्छता ठेवण्यात येत होती. ती आता बंद झाली आहे. त्यामुळे माशांची संख्या कैक पटीने वाढली आहे.