
आयुष्यात बऱ्याच गोष्टी अनपेक्षितपणे घडत असतात. त्याची कल्पनाही करत नाही. एखादी कृती करताना आपण तिचा विचार करत नाही. पण जेव्हा ती कृती होते, त्यानंतर मात्र आपल्या हाती पश्चात्तापाशिवाय काहीच राहत नाही. माणूस म्हणूनच हतबल होतो. विचार न करता केलेली कृती माणसाला हतबल करते. हेच ते कारण आहे,ज्यामुळे मनुष्य दुखी होतो. एक अशीच घटना घडली. ती जीवाच्या आकांताने पळत होती. संपूर्ण शरीर घामाघूम झाली होती. तिच्या मागोमाग तिचा नवरा दांडकं घेऊन येत होता आणि अचानक… असं काय घडलं त्या दोघांमध्ये?
ती जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होती. तिचं संपूर्ण अंग घामाघून झालं होतं. कारण नवरा दांडकं घेऊन मागे लागला होता. ती धावतच होती. नॉनस्टॉप… दिसेल त्या दिशेला. तिच्यासमोर काही अंतरावर एक विहीर होती. तिने कशाचा कशाचा विचार केला नाही. थेट विहिरीत स्वत:ला झोकून दिलं. तिच्यापाठोपाठ नवऱ्यानेही कशाचा विचार न करता विहिरीत उडी मारली. एखाद्या सिनेमात शोभावा असा हा सीन होता. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जाम व्हायरल होतोय.
पति की पिटाई से बचने के लिए पत्नी कुएं में कूदी।💔
उत्तर प्रदेश से दिल दहला देने वाला खबर महिला ने घरेलू हिंसा से बचने के लिए कुएं में छलांग लगा दी। ग्रामीणों ने बचाई जान।
घरेलू हिंसा के खिलाफ सख्त कार्रवाई होनी चाहिए। pic.twitter.com/CxizwxWDJI— Shagufta khan (@Digital_khan01) November 5, 2025
हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील एका ग्रामीण भागातील असल्याचं सांगितलं जात आहे. काही तरी वाद झाल्यानंतर एक महिला नवऱ्याच्या मारापासून वाचण्यासाठी जीवाच्या आकांताने पळताना या व्हिडीओत दिसत आहे. ही महिला पळताना आरडाओरड करत आहे. वाचवा हो, वाचवा होचा टाहो फोडताना दिसत आहे. त्यानंतर ही महिला धावता धावता एका विहिरीत पडल्याचं दिसत आहे. तर बायकोला विहिरीत पडलेलं पाहून नवराही विहिरीत उडी मारतावा दिसत आहे. त्याच्या हातात दांडका होता. बायकोसाठी त्यानेही विहिरीत उडी मारली. काही क्षणात हा सर्व प्रकार घडला. त्यामुळे पाहणाऱ्या लोकांना एकच धक्का बसला. त्यानंतर विहिरीच्या जवळ डोकावणाऱ्यांची संख्या वाढली.
दरम्यान, हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील एका गावातील असल्याचं सांगितलं जात आहे. पण हा व्हिडीओ कधीचा आहे? कुणी काढला? कुठला आहे याची काहीच पुष्टी झालेली नाही. या व्हिडीओबाबतचा कुठलाही दावा कुणी केला नाही. मात्र व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचं कळतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओ खरा की खोटा हा प्रश्न आहेच. पण व्हिडीओ पाहणाऱ्यांना मात्र धक्का बसल्याशिवाय राहत नाही.
या व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रियाही पावसासारख्या कोसळत आहेत. अनेक लोक त्यावर बोलत आहेत. काही महिला यूजर्सने तर हा व्हिडीओ पाहून सहानुभूती दाखवली आहे. कौटुंबिक हिंसाचाराचं किंवा छळाचं हे मोठं उदाहरण असल्याचं या महिला म्हणत आहेत. तर काही लोक हा व्हिडीओ पाहून नाटक असल्याचं म्हणत आहेत. तर काहींच्या मते हा व्हिडीओ नकली आहे.
हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि त्यात दिसणारे लोक कोण आहेत, याचे उत्तर सध्या कोणाकडेही नाही. पण या व्हिडिओने लोकांना हादरवून टाकले आहे आणि पुन्हा एकदा हा प्रश्न उभा केला आहे की आपल्या समाजातील घरगुती हिंसा अखेर कधी संपणार? सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहे आणि लोक त्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.