
सोशल मीडियावर कधी काय आणि कोण व्हायरल होईल काही सांगता यायचं नाही. कोणाचं गाणं, तर कोणाचा डान्स. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका लग्नसंमारंभातला असून त्यासमारंभातील एका महिलेच्या डान्सचा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.
‘लैला मैं लैला’वर महिलेचा भन्नाट डान्स
या व्हायरल व्हिडीओमध्ये एका लग्नसमारंभात महिलांचा ग्रुप धम्माल डान्स करताना दिसत आहे. त्यातील एका महिलेचा डान्स जबरदस्त व्हायरल झाला आहे. ‘लैला मैं लैला’ या गाण्यावर या सर्व महिला डान्स करताना दिसत आहेत. त्यातील व्हायरल झालेल्या महिलेनं भन्नाट डान्स केलेला दिसत आहे. तिने या गाण्यावर केलेले डान्सस्टेप पाहून तिच्यासोबत डान्स करणारेही अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहतात.
काकूंचा डान्स पाहून इतर महिलाही शॉक
या महिलेचे डान्स मुव्हमेंट सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. ती प्रचंड उत्साहात डान्स करताना दिसत आहेत. तिचा हा डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनीही तिच्या डान्स स्टेप आणि तिचा उत्साह पाहून आश्चर्य वाटलं आहे. तसेच ती करत असलेल्या डान्स स्टेप्स पाहून आसपासच्या इतर महिलाही शॉक होतात. तिचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हिडीओवर 16 मिलियनहून अधिक व्ह्युज
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dipesh5923 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत 16 मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर आठ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.
नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “हिच्यासारखी सासू मिळायला हवी”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “या काकूंनी त्यांचा काळ नक्कीच गाजवला असेल”, तर एकाने लिहिलंय की, “काकू खरंच भारी नाचताय”,तर काहींनी कमेंट केली आहे की, “छान नाचताय, पण जरा थांबा.”असं म्हणत नेटकऱ्यांनीही या महिलेचं कौतुक केलं आहे.
पण या व्हिडीओवरून एक गोष्ट लक्षात येते की महिला त्यांच्या संसारात, घर, मूलं सांभाळण्यात इतक्या व्यस्त असतात की त्यातून त्याना उसंत मिळत नाही. अशा समारंभावेळी मात्र त्यांना मिळालेला हा वेळ त्यांच्या एन्जॉय करण्याचा असतो त्यामुळे या वेळेचा नक्कीच त्यांनी आनंद घ्यायला हवा.