Virat Kohli : टी-ट्वेंटी विश्वचषकातल्या पराभवानंतर कोहलीचं एकदिवसीयचं कर्णधारपदही काढलं

विराट कोहली(Virat Kohli)नं स्वत:हून टी-ट्वेंटीचं कर्णधारपद सोडलं होतं. आता बीसीसीआय(BCCI)नं त्याचं एकदिवसीय(One Day Cricket)चं कर्णधारपदही काढून घेतलं आहे. कर्णधारपद सोडण्यासाठी बीसीसीआयनं कोहलीला ४८ तासांचा अवधी दिला होता.

Virat Kohli : टी-ट्वेंटी विश्वचषकातल्या पराभवानंतर कोहलीचं एकदिवसीयचं कर्णधारपदही काढलं
विराट कोहली आणि रोहित शर्मा
| Edited By: | Updated on: Dec 09, 2021 | 11:54 AM

मुंबई : नुकत्याच झालेल्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धे(T-20 World Cup)तल्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर टीम इंडिया(Team India)त मोठे बदल करण्यात येतायत. विराट कोहली(Virat Kohli)नं स्वत:हून टी-ट्वेंटीचं कर्णधारपद सोडलं होतं. आता बीसीसीआय(BCCI)नं त्याचं एकदिवसीय(One Day Cricket)चं कर्णधारपदही काढून घेतलं आहे. कर्णधारपद सोडण्यासाठी बीसीसीआयनं कोहलीला ४८ तासांचा अवधी दिला होता. विशेष म्हणजे कोहली कर्णधारपद सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे ते त्याच्याकडून हिरावून घेतल्याची चर्चा आहे.

रोहित शर्माकडे धुरा
एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, आधी कोहलीनं टी-ट्वेंटीचं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर वनडेचं कर्णधारपद सोडण्यासाठी बीसीसीआयनं त्याला ४८ तासांची मुदत दिली. या कालावधीत बीसीसीआयच्या निवड समितीनं वाट पाहिली, मात्र कोहलीकडून काही उत्तर आलं नाही, त्यानंतर ४९व्या तासाला निर्णय घेऊन त्याचं कर्णधारपद रोहित शर्मा(Rohit Sharma)कडे दिलं आहे.

आगामी विश्वचषकाच्या दृष्टीनं निर्णय
२०२३मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आलाय. अजूनपर्यंत कोहलीनं यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विविध वृत्तसंस्थांच्या मते, कोहली २०२३पर्यंतच्या वर्ल्डकपपर्यंत कर्णधारपदावर राहू इच्छित होता. मात्र निवड समितीनं ती संधी दिली नाही. हा निर्णय तेव्हाच झाला ज्यावेळी टी-ट्वेंटी वर्ल्डकपमधून टीम इंडिया बाहेर फेकली गेली.

सन्मानजनक निरोप देऊ इच्छित होती, मात्र…
कोहली साधारण पाच वर्षांपासून संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळतोय. त्यामुळे निवड समिती त्याला सन्मानजनक निरोप देऊ इच्छित होती. तशी संधीही दिली होती मात्र शेवटी असा निर्णय घ्यावा लागला. कोहली त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जात होता.

IND vs SA : टीम इंडियाचे चार स्टार खेळाडू गंभीर जखमी, द. आफ्रिकावारी रद्द

team india : वनडे, टी-20 संघाचा नवा कॅप्टन रोहित शर्मा, तर कसोटीतही रोहित व्हाईस कॅप्टन

Ashes 2021: राख भरलेल्या छोट्याश्या ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमधलं महायुद्ध सुरु, जाणून घ्या अ‍ॅशेसचा इतिहास