AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

team india : वनडे, टी-20 संघाचा नवा कॅप्टन रोहित शर्मा, तर कसोटीतही रोहित व्हाईस कॅप्टन

भारतीय टीमच्या टी-20 आणि वनडे टीमची धुरा आता हिटमॅन रोहित शर्मा याच्याकडे असणार आहे. बीसीसीआयने अधिकृतरित्या नव्या कॅप्टनची घोषणा केली आहे. तर रोहितकडे कसोटी क्रिकेटच्या संघाचं उपकर्णधारपदही देण्यात आले आहे.

team india : वनडे, टी-20 संघाचा नवा कॅप्टन रोहित शर्मा, तर कसोटीतही रोहित व्हाईस कॅप्टन
रोहित शर्मा
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 8:17 PM
Share

मुंबई : बीसीसीआयने आज मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने आज टीम इंडियाच्या नव्या टी-20 आणि वनडे टीमच्या कॅप्टनची घोषणा केली आहे. विराट कोहलीचा कामाचा ताण कमी करण्यासाठी वनडे आणि टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराट कोहलीने घेतला होता. त्यानंतर टीम डंडियाचा टी-20 आणि वनडेत नवा कर्णधार कोण असणार यांची उत्सुक्ता सर्वांना लागली होती, ती प्रतीक्षा आता संपली आहे, कारण बीसीसीआयने नवा कर्णधार जाहीर केला आहे.

टी-20 वनडे टीमचा कॅप्टन रोहित शर्मा

भारतीय टीमच्या टी-20 आणि वनडे टीमची धुरा आता हिटमॅन रोहित शर्मा याच्याकडे असणार आहे. बीसीसीआयने अधिकृतरित्या नव्या कॅप्टनची घोषणा केली आहे. तर रोहितकडे कसोटी क्रिकेटच्या संघाचं उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. त्यामुळे संघ एका नव्या नेतृत्वात इथून पुढील वाटचाल करणार आहे.

नवा कोच, नवा कॅप्टन

टीम इंडियाचा अलिकडेच कोचही बदलला आहे. रवी शास्त्री पायउतार होऊन संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रवीड (द वॉल) ची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता टीम इंडियाच्या वनडे आणि टी-20 संघाचा नवा कर्णधारही जाहीर करण्यात आला आहे.

रोहितची सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी

रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चमकदार कामगिरी करत आहे. रोहितला सध्याच्या घडीचा सर्वात बेस्ट आणि स्फोटक ओपनर मानले जाते, त्याच्या नावावर अनेक उतुंग रेकॉर्ड आहेत. वनडे क्रिकेटमध्ये तीन डबल सेंच्युरी मारणारा तो एकमेव खेळाडू आहे. तर एका विश्वकप स्पेर्धेत 5 शतके ठोकणाराही तो जगात एकमेव खेळाडू आहे. अलिकडेच त्याची कसोटी क्रिकेटमधील कामगिरीही सुधारली आहे.

ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार

विराट कोहलीच्या नावावर अनेक चांगले विक्रम आहेत. मात्र आयसीसी इव्हेंटमध्ये त्याची कामगिरी म्हणावी अशी झाली नाही. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वात जिथे टीम गेली तिथे ट्रॉफी जिंकून आली आहे. शिवाय रोहितच्या नावावर आयपीएलमध्ये पाच ट्रॉफी जिंकण्याचा विक्रमही आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडली आहे.

Rip bipin rawat : मधुलिका रावत यांचं देशासाठीचे हे योगदान माहीत आहे का? वाचा सविस्तर

महिलेचा शेजाऱ्यावर जीव जडला, मग प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला; वाचा सविस्तर नेमके काय घडले?

Aurangabad: धम्ममिशन पॅगोड्याचे ऐतिहासिक लोकार्पण, राज्यभरातील भिख्खूंच्या उपस्थितीत चढवला सोन्याचा छत्रीकळस

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.