AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझा रेट किती आहे? भर कार्यक्रमात गायिकेला प्रश्न विचारताच अँकरने खाल्ला चप्पलेने मार, Video Viral

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भर कार्यक्रमामध्ये एका महिला गायिकेला 'तुझा रेट किती आहे' असा प्रश्न विचारण्यात आला होता. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

तुझा रेट किती आहे? भर कार्यक्रमात गायिकेला प्रश्न विचारताच अँकरने खाल्ला चप्पलेने मार, Video Viral
व्हायरल व्हिडीओImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 24, 2026 | 1:54 PM
Share

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. कधी कधी सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ हे माहिती देणारे असतात तर कधी कधी एखाद्या घटनेबाबत माहिती मिळवण्यासाठी या व्हायरल व्हिडीओंचा फायदा होता. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा थक्क करणारा आहे. या व्हिडीओमध्ये एका महिला गायिकेला अँकरने थेट ‘तुझा रेट किती आहे’ असा प्रश्न विचारला आहे. त्यानंतर महिला गायिकाने संतापून अँकरला चप्पलने चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा अनेकांना वाटले की हा एक पब्लिसिटी स्टंट आहे. पण नंतर व्हिडीओ मागचे सत्य समोर आले. हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील असल्याची पुष्टी झाली. व्हिडीओमध्ये दिसणारी गायिका ही निशा उपाध्याय आहे. निशा ही अँकरला ज्या प्रकारे चप्पलने मारहाण करते ते पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

नेमकं काय घडलं?

भोजपुरी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायिका निशा उपाध्याय, जी सर्वाधिक फी घेणाऱ्या गायिकांपैकी एक मानली जाते, तिच्या एका लाईव्ह स्टेज शोमधील घटना सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिच्या फीबाबत (रेट) लोकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते, पण एका अँकरने हा प्रश्न इतक्या अपमानजनक पद्धतीने विचारला की, गायिकेचा राग अनियंत्रित झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, लाईव्ह कार्यक्रमादरम्यान अँकरने निशाला थेट “तुझा रेट काय आहे?” असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच निशा उपाध्याय प्रचंड संतापली. तिने त्वरित प्रतिक्रिया देत अँकरला मारण्यासाठी पायातील चप्पल काढली आणि “हा माझा रेट सांगणार का?” असं म्हणत त्याच्यावर तुटून पडली. त्यानंतर मंचावरच खळबळ माजली. उपस्थित लोकांनी आणि इतर कलाकारांनी मध्ये पडून परिस्थिती आटोक्यात आणली, अन्यथा मोठा प्रकार घडला असता.

नेटकऱ्यांनी घेतली गायिकेची बाजू

निशा उपाध्यायचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून, अनेकांनी तिच्या या धाडसी कृतीचे समर्थन केले आहे. काही यूजर्स म्हणत आहेत की, “अशा अपमानास्पद वागणुकीला तोंड देण्यासाठी हे योग्यच होते. महिलांच्या सन्मानाची हेळसांड करणाऱ्यांना अशाच प्रकारे धडा शिकवला पाहिजे.” तर दुसऱ्या बाजूने काहींनी अँकरच्या वागणुकीला चुकीचे ठरवत कडक कारवाईची मागणी केली आहे. “गायिकेसोबत असा प्रकार करणे पूर्णपणे अक्षम्य आहे,” असा एका कमेंटमध्ये म्हटले आहे.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार